Mughal E Azam Song Story: बॉलिवूडच्या (Bollywood News) कल्ट सिनेमांची ज्यावेळी चर्चा रंगते, त्यावेळी 60 च्या दशकातल्या मुगल-ए-आज़म सिनेमाचा उल्लेख आवर्जुन केला जातो. या फिल्मनं ना केवळ बॉक्स ऑफिसवर (Box Office) कमाईचे रेकॉर्ड ब्रेक केले, तर त्या काळातल्या बॉलिवूडच्या सर्वात महागड्या सिनेमाचा टॅगही मिळवला. हा टॅग आजही याच फिल्मच्या नावावर आहे. या सिनेमातली स्टार कास्ट, त्यांचा अभिनय, सिनेमाचा सेट आणि सिनेमातल्या गाण्यांनी चाहत्यांना भूरळ घातली. 

Continues below advertisement


1960 मध्ये, भारतीय चित्रपटसृष्टीत 'मुघल-ए-आझम' (Mughal E Azam Movie) चित्रपटानं इतिहास रचला. या चित्रपटानं केवळ बॉक्स ऑफिसवरील रेकॉर्ड तोडले नाहीत तर, बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित आणि महागडं गाणं सादर केलं. 'प्यार किया तो डरना क्या...' हे गाणं 65 वर्षांनंतरही प्रेक्षकांना आवडतं. पण या गाण्याची भन्नाट आणि तितकीच गमतीशीर स्टोरी आहे. बॉलिवूडच्या सुपरहिट गाण्यांपैकी एक असलेलं, 'प्यार किया तो डरना क्या...' हे गाणं एका गायकानं चक्क बाथरूममध्ये गायलेलं. 


'प्यार किया तो डरना क्या...' अजरामर गाणं बाथरूममध्ये का गायलेलं? 


नौशाद यांनी संगीतबद्ध केलेली या सिनेमातली गाणी चित्रपटाचा आत्मा होती. या सर्वांमध्ये 'प्यार किया तो डरना क्या...' हे गाणं अजराम झालं. 


शकील बदायुनी यांनी लिहिलेले आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं लोकांनी अक्षरशः लोकांनी डोक्यावर घेतलं. पण, या गाण्याचं रेकॉर्डिंग त्या काळासाठी अद्वितीय होतं. खरं तर, त्यावेळी इको इफेक्ट्स क्वचितच वापरले जायचे. त्यामुळे लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजात त्यांना हवे ते भाव आणण्यासाठी बाथरूममध्ये रेकॉर्ड केलं. या गाण्याच्या फायनल वर्जनला मंजुरी मिळण्यापूर्वी या गाण्यात 105 वेळा बदल करण्यात आले होते. 


'प्यार किया तो डरना क्या...' हे संपूर्ण गाणं मोहन स्टुडिओमध्ये चित्रित करण्यात आलं होतं, जिथे यासाठी खास एक भव्य पॅलेस सेट बांधण्यात आला होता. मधुबालानं साकारलेली 'अनारकली'नं सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. तर पृथ्वीराज कपूरच्या 'अकबर' या व्यक्तिरेखेनं या दृश्याच्या आकर्षणात आणखी भर घातली.


दरम्यान, सौंदर्याची खाण, दिग्गज अभिनेत्री मधुबाला आणि दिलीप कुमार स्टारर सिनेमा 'मुघल-ए-आझम' 5 ऑगस्ट 1960 रोजी रिलीज करण्यात आलेली. या फिल्मनं आपल्या बजेटनं बॉलिवूडमध्ये एक बेंचमार्क सेट केला होता.  के. आसिफ यांनी दिग्दर्शित केलेल्या 'मुघल-ए-आझम' सिनेमात पृथ्वीराज कपूर आणि दुर्गा खोटे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी दमदार अभिनय केलेला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Marathi Actress Ranjana Deshmukh Story: '10-12 फुटांवर पडलेला हात ती सरकत जाऊन घेऊन आली...'; दिग्गज मराठी अभिनेत्रीच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी घटना