Sushant Singh Rajput : आज या जगात नसला तरीही अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) त्याच्या अभिनयामुळे कायमच प्रेक्षकांच्या मनात राहतो. 'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेतून सुशांत घरोघरी पोहचला. पण त्याला रुपेरी पडद्यावर मोठा ब्रेक मिळाला तो भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) बायोपिकमधून. 'एमएस धोनी:द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमातून सुशांतने त्याच्या अभियनाची छाप मोठ्या पडद्यावर सोडली. या चित्रपटादरम्यान त्याची आणि एमएस धोनीची चांगली मैत्री देखील झाली होती. 


या सिनेमावेळी सुशांत आणि धोनीची वारंवार भेट व्हायची. भेटीमध्ये धोनी त्याला त्याच्या आयुष्यातले किस्से सांगायचा. पण एकदा धोनी सुशांतवर चांगलाच चिडला होता. याबद्दल धोनीने सिनेमाच्या प्रमोशनवेळी देखील भाष्य केलं होतं. पण धोनी सुशांतवर का आणि कशासाठी चिडला होता, त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


म्हणून धोनी सुशांतवर चिडला होता


याबाबत खुलासा करताना धोनीनं म्हटलं की, सुशांत एकच प्रश्न बऱ्याच वेळा विचारायचा. त्याची त्याला सारखी उत्तरं मिळाली की त्याला ते खरं वाटायचं. त्याला ते सगळं खरं वाटलं की तो दुसऱ्या प्रश्नावर जायचा. मला सुरुवातीला स्वत:बद्दल इतकं बोलणं थोडं खटकत होतं. मला या गोष्टीचा फार कंटाळा यायचा त्यामुळे मी त्याच्यावर चिडायचो. 


'तू खूप प्रश्न विचारतोस'


यावर सुशांतनेही मजेशीर उत्तर दिलं होतं. त्यानं म्हटलं की, सुरुवातीच्या दोन ते तीन दिवसांत मी त्याला काही प्रश्न विचारले. त्याची त्याने मला शांतपणे उत्तरंही दिलीत. पण नंतर त्याने म्हटलं की, तू खूपच प्रश्न विचारतोस. त्यावेळी त्याने मला मी ब्रेक घेऊन परत येतो असं सांगितलं. मग मी एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला विचारायचो. त्याला ते अजिबात आवडायचं नाही. 


'असा' होता सुशांत सिंह राजपूतचा सिनेप्रवास


छोटा पडदा गाजवल्यानंतर सुशांत रुपेरी पडद्याकडे वळाला. त्याचे अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. 'काई पो चे' या सिनेमाच्या माध्यमातून सुशांतने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याच्या पहिल्या सिनेमापासून ते शेवटच्या सिनेमापर्यंत एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे 'मृत्यू'. 'काय पो छे', 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'डिटेक्टिव ब्योमकेश बख्शी', 'सोनचिरैया', 'केदारनाथ', 'बेचारा दिल' अशा अनेक सिनेमांत सुशांत महत्त्वाच्या भूमिकेत होता. 


ही बातमी वाचा : 


Vanita Kharat : 'झाले मी सून लोढ्यांची', महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातचा होळीनिमित्त खास उखाणा