Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर एका जुन्या व्हिडिओमुळे सध्या चर्चेत आहेत. या व्हिडिओमध्ये ती अभिनेत्री बिपाशा बासूच्या शरीरावर टीका करताना दिसत आहेत. मी बिपाशापेक्षा अधिक सुंदर असल्याचं या व्हिडीओमध्ये मृणाल ठाकूर म्हणाली आहे. शिवाय बिपाशाचे Muscles पुरुषासारखे असल्याचे देखील मृणाल सांगत आहे. दरम्यान, अभिनेत्री बिपाशा बासू हिने गुरुवारी (दि.15) एका क्रिप्टिक पोस्टद्वारे मृणालला उत्तर दिले. दरम्यान, त्यानंतर मृणाल ठाकूरने स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे.
मृणाल ठाकूर हिने गुरुवारी (दि.15) आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्पष्ट केले की, तिने जाणूनबुजून असे काहीही म्हटले नव्हते. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले आहे – “19 वर्ष वय असताना माझ्या टीनएजमध्ये मी बऱ्याच अशा मूर्खपणाच्या आणि अविचारी गोष्टी बोलले होते. मला तेव्हा कळत नव्हते की आवाजात किती ताकद असते किंवा केवळ विनोदातसुद्धा बोललेले शब्द किती दुखावू शकतात. पण तसे झाले आणि त्याबद्दल मला फार वाईट वाटते.”
“सुंदरता प्रत्येक रूपात असते”
मृणाल ठाकूर यांनी पुढे लिहिले – “माझा कधीही कोणालाही बॉडी शेम करण्याचा हेतू नव्हता. हे एका मुलाखतीत मजेदार अंदाजात बोललेले होते. हा विनोद मर्यादेपलीकडे गेला. काळाच्या ओघात मला कळले आहे की सुंदरता प्रत्येक रूपात असते आणि आता मी त्यालाच खरे महत्त्व देते.”
मृणालला प्रत्युत्तर देण्यासाठी बिपाशाची क्रिप्टिक पोस्ट
मृणाल ठाकूर यांच्या व्हायरल व्हिडिओच्या संदर्भात बिपाशा बसू यांनी बुधवारी एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केला होता. त्यात त्यांनी लिहिले होते – “सशक्त स्त्रिया एकमेकींना वर नेतात. सुंदर महिलांनो, तुमचे स्नायू मजबूत करा. आपल्याला मजबूत व्हायलाच हवे. स्नायू आणि शरीर तुम्हाला नेहमीच चांगले शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळविण्यास मदत करतात. ही जुनी विचारसरणी मोडा की मजबूत दिसणे किंवा शारीरिकदृष्ट्या फिट असणे खूप महत्त्वाचे नाही.”
इतर महत्त्वाच्या बातम्या
Marathi Actor Upcoming Movie Kadi Patta: 'अ बिटरस्वीट लव्ह स्टोरी...', पाठमोरी बसलेली हिरोईन अन् तिनं विचारलेला 'तो' प्रश्न; भूषण पाटीलच्या 'कढीपत्ता'मधली प्रेमकहाणी