Mauni Roy Disha Patni: बॉलीवूडची अभिनेत्री मौनी रॉय (Mauni Roy) आणि सुरज नांबियार (Suraj Nambiyar) यांनी 4 वर्षांचा सुखी संसार संपल्याची जाहीर पोस्ट करत विभक्त झाल्याची घोषणा केली. परस्पर संमतीनं वेगळं झाल्याचं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेत्री मौनी रॉय आणि तिची खास मैत्रीण अभिनेत्री दिशा पाटनी यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या पोस्टमध्ये मौनी रॉय आणि दिशा पाटनी यांनी गळ्यात हार घातले आहेत. या पोस्टमध्ये दिशा पाटनी आणि मौनी रॉय यांनी त्यांच्या नात्याची घोषणा करणारी कथित पोस्ट सोशल मीडियावर फिरतेय. या पोस्टमध्ये ' एक अध्याय संपला. मला तिच्यामध्ये माझा आयुष्य सापडलं आहे. हो ..दिशा आणि मी या प्रेमप्रथेला लग्नात बदलण्यासाठी तयार आहोत. जखमा भरून काढण्यापासून ते कायमचा आनंद पर्यंतचा हा प्रवास सुरू होतोय. ' असं या पोस्टमध्ये लिहिले आहे.
व्हायरल पोस्ट मागे कितपत सत्य ?
मोनी रॉय आणि दिशा पाटनी यांच्या नात्याची आणि लग्नाच्या कथित घोषणेची व्हायरल पोस्ट अधिकृत नाही. ही पोस्ट पूर्णतः खोटी असून या पोस्टसाठी तयार केला गेलेला फोटो गेल्यावर्षीचा आहे. मौनी रॉय आणि दिशा पाटनी दोघी घट्ट मैत्रिणी असून त्या जून 2025 मध्ये देशाच्या वाढदिवसानिमित्त इस्कॉन मंदिराला भेट देण्यासाठी गेला होता. या फोटोवरील कॅप्शन पूर्णपणे एडिट केलेले आहेत. दोन्ही अभिनेत्रींकडून त्यांच्यातील प्रेम संबंध किंवा लग्नाच्या योजनांना दुजोरा देणारे कोणतंही अधिकृत निवेदन किंवा सोशल मीडिया पोस्ट आलेली नाही.
सोशल मिडीयावर दिशा पाटनी ट्रोल
दुसरीकडे मौनी रॉय आणि सुरज नांबियार यांनी instagram वर एकमेकांना अनफोलो केल्यानंतर सोशल मीडियावर अफवा पसरू लागल्या. दुसरीकडे लोकांच्या लक्षात आलं की दिशा पाटनीनेही सुरज नांबियारला अनफॉलो केलं आहे. त्यानंतर दोघांच्या ब्रेकअप साठी दिशा पाटणी जबाबदार असल्याचं म्हणत तिला ट्रोल केलं जाऊ लागलं. अखेर मौनी रॉयने सोशल मीडियावर तिच्या आणि सुरजच्या नात्याबद्दल कोणत्याही खोट्या बातम्या किंवा अफवा पसरवू नयेत आणि तिच्या कुटुंबाला व तिला स्पेस आणि प्रायव्हसी दिली जावी, अशी विनंती तिने त्या पोस्टमध्ये केली आहे.
मौनीनं शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "आम्ही सर्वांना नम्र विनंती करतो की, आम्हाला आमचा एकांत आणि मान द्यावा, तसेच माझ्या किंवा सूरजच्या संदर्भात कोणत्याही खोट्या बातम्या पसरवू नये. या कठीण काळात आम्ही तुम्हा सर्वांकडून शांतता राखण्याची आणि आमची प्रायव्हसी राखण्याची अपेक्षा करतो. आम्ही सर्व प्रसारमाध्यमांना नम्र विनंती करतो की, कृपया अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करणं थांबवावं... सूरज आणि मौनी..."
