Ankita Walawalkar: 'कोकण हार्टेड गर्ल' नावाने सगळे महाराष्ट्राला माहीत असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चर्चेत असतेच. कधी मालवणी बोलत तर कधी चालू घडामोडींवर आपलं मत परखडपणे व्यक्त करताना ती दिसते. आता एका वेगळ्याच कारणामुळे अंकिता चर्चेत आली आहे. जगभरात प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये एन्ट्री घेत तिने सगळ्या मराठी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तिने नुकतेच तिच्या कान्सवारीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एक स्वप्न पूर्ण झाल्याचं तिने या पोस्टमध्ये म्हटलं. फ्रान्सच्या ग्लोबल मंचावर उभे राहताना मराठी मातीच प्रतिनिधित्व करत तिने या चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली. 

अंकिता वालावलकरची 'कान्स'वारी चर्चेत 

फ्रान्समधील कान्स शहरात दरवर्षी होणाऱ्या या चित्रपट महोत्सवाकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. यावर्षी या महोत्सवाचे 79 वे वर्ष होते. यंदा 12 मे ते 23 मे या कालावधीत हा सोहळा पार पडतोय. अंकिताने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर या आंतरराष्ट्रीय मंचावरील काही फोटोज शेअर केले आहेत. तिची पोस्ट सध्या व्हायरल होते. कान्स महोत्सवात, त्या आंतरराष्ट्रीय मंचावर उभे राहताना अंकिताचा कॅज्युअल पेहरावही चर्चेत आहे. डेनिम जीन्स - शर्ट आणि स्निकर्स अशा लुकमध्ये ती कांच शहरात पोहोचली होती. त्यामुळे कोकण हार्टेड गर्ल थेट कांसमध्ये पोहोचल्यानं तिचे चाहते सुखावले आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. अनेकांनी कोकणची लेख कांस फिल्म फेस्टिवलला हजेरी लावत असल्याचे पाहून अभिमान वाटत असल्याचे म्हटलं आहे.

कॉर्नस्टचा रेड कार्पेट वर पोहोचल्यानंतर आपला आनंद व्यक्त करताना ती म्हणाली ' आज या आंतरराष्ट्रीय मंचावर उभे राहताना मला सर्वात मोठा अभिमान एकाच गोष्टीचा वाटतोय की, मी इथे माझ्या मराठी भाषेचं आणि संस्कृतीचं प्रतिनिधित्व करत आहे ' हे क्षण स्वप्नातून थेट अवतरले आहेत. इथे येण्यापर्यंतचा प्रवास, भावना आणि अखेर इथपर्यंत पोहोचले. ' असं की त्यांना म्हटलं.