Most Expensive Divorce In Bollywood: बॉलिवूड (Bollywood News) आणि इथली शान शौकत याची बात काही औरच... बॉलिवूड आणि इथं वावरणारे सेलिब्रिटी यांच्या आयुष्याबाबत अनेकांना उत्सुकता असते. सेलिब्रिटी (Bollywood Celebrity) काय खातात, कसे राहतात, ते शॉपिंग कुठून करतात? असे असंख्य प्रश्न सेलिब्रिटींबाबत आपल्याला पडतात. पण, सेलिब्रिटींच्या लाईफस्टाईलसोबतच त्यांचे घटस्फोटही एक्सपेन्सिव्ह असतात बरं का... हे आम्ही नाहीतर, इंडस्ट्रीत आजवर झालेले घटस्फोट सांगतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटस्फोटाबाबत (Bollywood Most Expensive Divorce) सांगणार आहोत. हा घटस्फोट बॉलिवूडचा आजवरचा सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे.
जिथे बॉलिवूड स्टार्स संदर्भात चर्चा येतात, तिथे कोणतीही गोष्ट स्वस्त असू शकत नाही. मग ते लग्न असो किंवा घटस्फोट... आज आपण बॉलिवूडच्या सर्वात महागड्या घटस्फोटाबाबत जाणून घेऊयात... घटस्फोटामुळे झालेला तोडगा सुमारे 100 लोकांच्या आयुष्यभराच्या कमाईइतका असू शकतो. घटस्फोटाची किंमत अशी आहे की, तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.
380 कोटींचा बॉलिवूडचा सर्वात महागडा घटस्फोट
हृतिक रोशन आणि सुझान खानचा घटस्फोट हा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट होता. मिडिया रिपोर्ट्सनुसार, हृतिक रोशनशी घटस्फोट घेतल्यानंतर सुझानला 380 कोटी रुपयांचा पोटगी मिळाली, जो आजपर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट ठरला आहे. दरम्यान, मालमत्ता किंवा रोख रक्कम यांसारख्या पोटगीबद्दलची माहिती अद्याप उघड केलेली नाही.
हृतिक रोशन, सुझान खानची हटके लव्हस्टोरी
हृतिक रोशन म्हणजे, बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा आणि सुझान खान म्हणजे, संजय खान यांची मुलगी. दोघेही बालपणीचे मित्र. 'कहो ना प्यार है' या सिनेमातून हृतिकनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण, त्यापूर्वीपासूनच हृतिक आणि सुझान यांचं सूत जुळलं होतं. मिडिया रिपोर्टनुसार, दोघेही लग्नापूर्वी तब्बल 4 वर्ष डेट करत होता. 2000 मध्ये बॉलिवूड डेब्यूनंतर लगेचच हृतकनं सुझान खानशी लग्न केलं. या जोडप्याला दोन मुलं आहेत. पण, लग्नाच्या चार वर्षांनी दोघांमध्ये मतभेद झाले आणि सुखी संसार मोडला. 2014 मध्ये हृतिक आणि सुझानचा घटस्फोट झाला.
दरम्यान, सुझान खानसोबत काडीमोड घेतल्यानंतर हृतिक रोशन सबा आझादच्या प्रेमात पडला. तर, सुझान आता अर्सलान गोनीला डेट करतेय. हृतिकच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, लवकरच 'वॉर 2' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :