Chanakya Niti: ते म्हणतात ना, आजकाल खऱ्याची दुनिया राहिली नाही, अनेक लोक यशाची पायरी जेव्हा चढतात, तेव्हा काही लोकांना ते पचत नाही, तेव्हा यशस्वी माणसाचे अनेक शत्रू निर्माण होतात. आपल्या आयुष्यात असे अनेक लोक असतात, ज्यांना आपले यश बघवत नाही, म्हणून मुद्दाम ते काहीना काही कारण काढून भांडण करतात, आणि शत्रुत्व ओढवून घेतात. आचार्य चाणक्यांनी चाणक्यनीतीत शत्रूंसाठी विशेष धोरणे सांगितली आहेत. चाणक्यांच्या मते, काहीही न बोलताही शत्रूंना धूळ चारायला लावता येणे शक्य आहे. अशा परिस्थितीत, शत्रूंसाठी चाणक्य यांचे धोरण काय आहे ते जाणून घेऊया.

काहीही न बोलता शत्रूला पराभूत करता येईल...

आचार्य चाणक्यांनी शत्रूंबाबत अनेक महत्त्वाच्या धोरणे सांगितली आहेत. चाणक्यांच्या या धोरणांना अजूनही रणनीती, राजकारण आणि वैयक्तिक जीवनात प्रासंगिक मानले जाते. चाणक्यांच्या धोरणांनुसार, काहीही न बोलता शत्रूंना धूळ चारायला लावता येते. अशा परिस्थितीत, चाणक्यांचे धोरण शत्रूंबद्दल काय म्हणते ते जाणून घेऊया.

हे सर्वात प्रभावी शस्त्र

चाणक्यनीतीत म्हटलंय, की जो माणूस आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवतो, तो शस्त्र न उचलताही शत्रूचा पराभव करू शकतो. आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा तुम्ही शत्रूच्या कडू शब्दांवर काहीच उत्तप देत नाही, किंवा गप्प बसता तेव्हा तुम्ही त्याची संपूर्ण रणनीती निष्प्रभ बनवता. तुमचे मौन त्याचा आत्मविश्वास आतून तोडण्यास सुरुवात करते. बऱ्याचदा मौन हेच सर्वात तीव्र आणि प्रभावी शस्त्र बनते.

हा यशाचा महान मंत्र...

चाणक्यनीतीत म्हटलंय, खरा विजेता तोच असतो जो त्याच्या यशाची जाहिरात करत नाही. जेव्हा तुम्ही दाखवल्याशिवाय यशस्वी होता, तेव्हा ते यश तुमच्या विरोधकांसाठी एक मूक आणि मजबूत उत्तर बनते. जेव्हा तुम्ही त्या यशावरही गप्प राहता तेव्हा ते त्यांना आतून हादरवते. शांतपणे पुढे जाणे हीच खरी चाणक्य नीति आहे.

शत्रूवर सर्वात मोठा प्रहार कसा कराल?

चाणक्यनीतीत म्हटलंय, टीका करणाऱ्यांना सर्वात मोठे उत्तर म्हणजे त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करणे. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूला महत्त्व देत नाही, तेव्हा तो त्याच्या स्वतःच्या शब्दांमध्ये आणि प्रयत्नांमध्ये अडकून तुटू लागतो. ही उपेक्षा त्याला आतून खाऊन टाकते. तो असे विचार करू लागतो की, तो तुमच्यासाठी काही बोलण्याइतका महत्त्वाचा नाही.

शत्रूच्या एक पाऊल पुढे राहा

चाणक्य म्हणतात की, शत्रूच्या योजना आधीच समजून घेणाऱ्या व्यक्तीला कोणीही हरवू शकत नाही. शत्रूच्या कारवायांवर बारीक लक्ष ठेवा, स्वतःला अंतर्गत तयारीत ठेवा आणि तुमच्या योजना गुप्त ठेवा. जेव्हा शत्रू हल्ला करायला येतो आणि तुम्ही आधीच तयार असता, तेव्हा त्याच्या सर्व युक्त्या निरुपयोगी ठरतात.

हेही वाचा :           

Numerology: 'या' जन्मतारखा एकमेकांच्या शत्रू का असतात? बऱ्याचदा लग्न टिकत नाही, इतक्या शत्रुत्वाचे कारण काय? अंकशास्त्रात म्हटलंय..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)