Guneet Monga : 'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या माहितीपटाने जगात प्रतिष्ठेचा समजला जाणारा ऑस्कर पटकावला. मात्र, या माहितीपटाच्या निर्माती गुनीत मोंगा यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते अशी माहिती संगीतकार एम. एम. किरवाणी यांनी दिली. किरवाणी याना आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला.
गुनीत मोंगा यांनी ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर आयोजकांवर नाराजी व्यक्त केली होती. पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्याला व्यक्त होण्याची संधी दिली नाही, आयोजकांनी माईक बंद केला असल्याचा आरोप मोंगा त्यांनी केला होता.
संगीतकार किरवाणी यांनी आपल्या पहिल्याच ऑस्कर पुरस्काराबाबत एका वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटले की, तुम्ही पुरस्कार जिंकल्यानंतर आनंदी व्हावे, हे स्वाभाविक आहे. मात्र, अतिउत्साही होऊ नये. गुनीत मोंगा यांना ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर बोलू दिले नव्हते. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते, अशी माहिती किरमाणी यांनी दिली.
गुनीत मोंगा यांचा माईक बंद झाला...
गुनीत मोंगा यांनी सांगितले की, जेव्हा तिचा माईक बंद झाला तेव्हा तिला धक्का बसला. 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान गुनीत यांनी सांगितले की,, 'मला ऑस्करमध्ये भाषण देण्याची संधी मिळाली नाही. मला याचा धक्का बसला होता. मला एवढंच सांगायचं होतं की भारतीय निर्मिती असलेला हा भारताचा पहिला ऑस्कर आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. मला बोलायला दिले नसल्याचे मोंगा यांनी सांगितले.
'द एलिफंट विस्परर्स' (The Elephant Whisperers) या भारतीय माहितीपटाने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscars 2023) सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्मचा पुरस्कार पटकावला आहे. या सिनेमाचं कथानक एक हत्ती आणि आणि त्याचा सांभाळ करणाऱ्या जोडप्याभोवती फिरतं. सिनेमात दाखवण्यात आलेल्या हत्तीचं नाव 'रघू' असं आहे. आता या माहितीपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर पर्यटकांनी रघुला पाहण्यासाठी तामिळनाडूमधील थेप्पाकडू एलिफंट कॅम्पमध्ये (Theppakadu Elephant Camp) गर्दी होत आहे.