Misha Agrawal Suicide: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर (Social Media Influencer) मीशा अग्रवालनं (Misha Agrawal) 24 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. 26 एप्रिल रोजी तिच्या वाढदिवशी तिच्या कुटुंबियांनी एक पोस्ट करत, तिचा मृत्यू झाल्याचं जाहीर केलं. तसेच, तिच्या कुटुंबीयांनी तिचं नैराश्य तिच्या मृत्यूचं कारण असल्याचंही पोस्टमध्ये सांगितलं आहे. पण, मीशा अग्रवालचं नैराश्यात (Misha Agarwal Is Depressed.) जाण्याचं कारण अत्यंत खळबळजनक आणि हादरवणारं आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालच्या बहिणीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये मिशाच्या फोनचा वॉलपेपर दिसत आहे. ज्यामध्ये मीशाची इन्स्टा प्रोफाईल आणि आणि त्यात 10 लाख फॉलोअर्स दिसत आहेत. हा फोटो शेअर करतच मीशाच्या बहिणीनं एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे. तसेच, तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'तिच्या फोनचा वॉलपेपरच खूप काही सांगून जातो. हेच तिच्या आयुष्याचं एकमेव टार्गेट होतं. इंस्टाग्राम हे खरं जग नाही आणि फॉलोअर्स हे खरं प्रेमही नाही, कृपया हे समजून घेण्याचा प्रयत्न करा.'
इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी झाल्यानंतर मीशा नैराश्यात...
मीशाच्या बहिणीनं पोस्टमध्ये लिहिलंय की, "माझ्या धाकट्या बहिणीनं इंस्टाग्राम आणि तिच्या फॉलोअर्सभोवतीच तिचं जग निर्माण केलं होतं, तिचं एकमेव लक्ष्य 10 लाख फॉलोअर्सपर्यंत पोहोचणं आणि प्रेमळ चाहते मिळवणं होतं. ज्यावेळी तिचे फॉलोअर्स कमी होऊ लागले, त्यावेळी ती अस्वस्थ झाली आणि तिला खूप वाईट वाटू लागलं. आपण काहीच करू शकत नाही, अशी भावना तिच्या मनात निर्माण झालेली. एप्रिलपासून ती खूप दुःखी होती, ती अनेकदा मला मिठी मारून रडायची आणि म्हणायची, माझे फॉलोअर्स कमी झाले तर मी काय करेन? माझं करियर संपून जाईल."
मीशाच्या बहिणीनं पुढे लिहिलंय की, "मी तिला धीर देण्याचा प्रयत्न केलेला, तिला मी वारंवार समजावून सांगितलं की, हे तिचं संपूर्ण जग नाही, हा फक्त एक साईड जॉब आहे आणि जर ते काम करत नसेल, तर हा काही शेवट नाही. मी तिला तिच्या प्रतिभेची, तिच्या एलएलबी पदवीची आणि पीसीएसजेची तयारीची आठवण करून दिली, तिला सांगितलं की, ती एक दिवस न्यायाधीश होईल आणि तिला तिच्या करिअरची काळजी करण्याची गरज नाही. मी तिला (मीशा) सल्ला दिला की, इन्स्टाग्रामकडे फक्त मनोरंजन म्हणून पाहा आणि त्याला तुझ्यावर वर्चस्व गाजवू देऊ नको. मी तिला तिच्या आनंदावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं, तसेच चिंता आणि नैराश्य सोडून देण्यास सांगितलं."
मीशाच्या बहिणीनं पोस्टमध्ये लिहिलंय की, "दुर्दैवानं, माझ्या धाकट्या बहिणीनं माझं ऐकलं नाही आणि ती इंस्टाग्राम आणि फॉलोअर्समध्ये इतकी हरवून गेली की, ती कायमची आपल्या जगाचा निरोप घेऊन गेली. ती इतकी निराश झाली की, तिनं स्वतःचा जीव घेतला, ज्यामुळे आमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं."
मैत्रिणीचा दावा भलताच, म्हणाली...
मीशा अग्रवालच्या एका मैत्रिणीनं या पोस्टवर कमेंट केली आहे आणि दावा केला आहे की, ती वेगळ्याच ट्रॉमामध्ये होती. मैत्रिणीनं बहिणीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलंय की, 'मी तिच्याशी अनेक वेळा बोलले, तिला स्वतःवर पूर्ण विश्वास होता आणि ती आत्मविश्वासू होती. तिला माहित होतं की, ती हे स्थान मिळवेल. हे एक निमित्त वाटतंय, असं वाटतंय की, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात काही अडचणीतून जात होती. कुटुंबानं अधिक चौकशी करावी, मी तिच्या काही गोष्टी यापूर्वीही पाहिल्या आहेत आणि असं दिसतंय की, ती कुणामुळे तरी दुखावली गेली होती. तरी तिच्या इमोशन्सचा तिच्यावर खोलवर परिणाम झाला होता, हे खूप वाईट आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :