Mi Jinkun Ghein Saar Serial: कलर्स मराठीवरील (Colors Marathi) लोकप्रिय मालिका 'मी जिंकून घेईन सारं' (Mi Jinkun Ghein Saar) या मालिकेची प्रचंड चर्चा होत आहे. ही मालिका कुटुंबातील अंतर्गत राजकारण आणि धक्कादायक रहस्यांमुळे रोमांचक (Entertainment) वळण घेत आहे. एकीकडे अनिकेत आणि छवी आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत असतानाच, दुसरीकडे एका धोकादायक सापळ्यात अनिकेतला अडकवण्याचा प्लॅन सुरू आहे. पण त्यामुळे मालिकेत कोणतं वळण येणार? हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.
मी जिंकून घेईन सारं मालिकेत नवा ट्विस्ट (Mi Jinkun Ghein Saar Colors Marathi Serial)
शकुंतलाला सोडवण्यासाठी अनिकेतच्या उचललेल्या पावलामुळे आणि अचानक समोर आलेल्या आर्थिक संकटात त्याचा जीव धोक्यात आल्याने प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकणार आहे, हे निश्चित. अशातच, शांभवीच्या प्रत्येक आव्हानाला आणि अपमानाला छवीने अत्यंत दमदार अन् सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "आजचा दिवस तुझा होता, पण लवकरच आम्ही मानाने या घरात परत येऊ," असे म्हणत छवीने शांभवीला दिलेल्या चॅलेंजमुळे आगामी भागांमध्ये एका जबरदस्त संघर्षाची ठिणगी पडली आहे.
मालिकेत घडत असलेल्या या घडामोडींमध्ये अनिकेत आणि छवीच्या नात्यातील गोडवा आणि त्यांचे वाढते प्रेम प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहे. संकटाच्या प्रत्येक पावलावर अनिकेतने छवीला दिलेला खंबीर पाठिंबा त्यांच्या नात्याला आणखी घट्ट बनवत आहे. एका बाजूला बाईजींना राहून राहून छवी आणि अनिकेतची येणारी काळजी आणि दुसऱ्या बाजूला शांभवीचे नवनवीन कारस्थान उघडकीस येण्याची शक्यता, या सर्व गोष्टींमुळे मालिकेत कमालीची रंगत निर्माण होणार आहे.
या सर्व थरारक घडामोडींनंतर आता राजगुरु कुटुंबात नेमके काय नवीन राजकारण रंगणार? अनिकेतवर आलेल्या या संकटातून ते दोघे कसे बाहेर पडणार? हे संकट नेमकं काय आहे ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी नक्की पहा 'मी जिंकून घेईन सारं', दररोज संध्याकाळी 7 वाजता, फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही JioHotstar वर.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
