Ranchi Students protest: झारखंडमध्ये (Jharkhand Protest) सध्या सरकारी भरती परीक्षांमधील कथित गोंधळाविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. रांची येथील आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज (Ranchi Police) केला. रांची येथील व्हिडीओ व्हायरल होताच होताच नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. तसेच अॅक्टर आणि फिल्ममेकर प्रकाश राज (Prakash raj) यांनीही नाराजी व्यक्त केली. आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांवर अश्रुधुराच्या नळकांड्या (Tear Gas) तसेच लाठीचार्जही करण्यात आला. यानंतर पोलिसांच्या या कारवाईवर प्रकाश राज (Prakash Raj Tweet) यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच संतापही व्यक्त केला. नेमकं काय घडलं? प्रकाश राज काय म्हणाले? पाहूयात.
प्रकाश राज यांची विद्यार्थ्यांसाठीची पोस्ट व्हायरल (Jharkhand Student Portest Prakssh Raj Shares tweet)
मिळालेल्या माहितीनुसार, खरंतर झारखंड येथे JPSC-JSSC भरती परीक्षांमधील कथित भोंगळ कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. 17 दिवस हे आंदोलन सुरु होते. सोमवारी विद्यार्थ्यांनी झारखंड विधानसभेला घेराव घालणार असल्याचे आवाहन केले. यानंतर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला. वॉटर कॅनन तसेच लाठीचार्जही करण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईवर प्रकाश राज यांनी तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
दिल्लीतील 'कॉकरोच जनता पार्टी'च्या 'चलो संसद' या मोर्चात सक्रीय झालेल्या प्रकाश राज यांनी अलिकडेच एक्स अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसेच नाराजीही व्यक्त केली. नाराजी व्यक्त करत म्हणाले, 'का, का अन् का... ही क्रूरता आता चालणार नाही. यामुळे आता केवळ अंहकारी सत्ताच कोसळणार', असं म्हणत प्रकाश राज यांनी आंदोलनस्थळावरील व्हिडीओ शेअर केला आहे. प्रकाश राज यांनी शेअर केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
झारखंड का पेटलं? (Jharkhand Students Protest Prakash Raj Shares Tweet)
29 जुलै 2026 पासून आंदोलकांनी रांची येथील जयपाल सिंह मुंडा स्टेडियममध्ये ठिय्या आंदोलन केले होते. राज्य सरकारमार्फत सीआयडी चौकशी करण्याऐवजी, संपूर्ण भरती प्रक्रियेतील अनियमिततेची स्वतंत्र चौकशी सीबीआय आणि इ़़डी यांसारख्या केंद्रीय यंत्रणांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. JPSC आणि JSSC या परिक्षांच्या कामकाजात पारदर्शकतेच्या सुधारणा लागू कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
