Medium Spicy Trailer : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतो. लवकरच त्याचा ‘मीडियम स्पाइसी’ (Medium Spicy) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये एका शेफच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. मीडियम स्पाइसी या चित्रपटामध्ये ललित हा एका शेफची भूमिका साकारणार आहे. तर प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) आणि अभिनेत्री पर्ण पेठे (Parna Pethe) या देखील या चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.
‘मीडियम स्पाइसी’ या चित्रपटामध्ये एक भन्नाट love triangle प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असं ट्रेलरमध्ये दिसत आहे. ललितनं या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोमध्ये ललित हा शेफ कोटमध्ये दिसत आहे.
चित्रपटामध्ये शेफ निस्सीम ही भूमिका ललित साकारणार आहे. त्याच्या भूमिकेची माहिती प्रेक्षकांना देण्यासाठी ललितनं सोशल मीडियावर त्याचा एक फोटो शेअर करुन त्याला कॅप्शन दिलं होतं, 'निस्सीम म्हणतो, पश्चात्ताप कामाला पुरेसा वेळ न दिल्याचा ही होऊ शकतो.'
सागर देशमुख , नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता हे कलाकार देखील या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर इरावती कर्णिक यांनी या चित्रपटाचे कथानक लिहिले आहे. मोहित टाकळकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. 17 जून 2022 रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
संबंधित बातम्या