Ruhi Singh Warns Fans After Fake WhatsApp Chats Surface: मनोरंजन सिनेसृष्टीतून खळबळजनक बातमी समोर येत आहे. 'मस्ती 4'या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री रूही सिंह एका फसवणुकीला बळी पडली आहे. तिच्या नावाचा वापर करत अश्लील चॅट्स व्हायरल केले जात होते. या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स लीक झाले आहेत. या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स समोर येताच रूहीनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. हे चॅट्स तिनं केले नसल्याचा दावा अभिनेत्रीनं केला आहे. तिनं सोशल मीडियावर या चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. तसेच चाहत्यांना या मोठ्या फसवणुकीबद्दल सावध केले आहे. हे प्रकरण समोर येताच रूही सिंहच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.
8 फेब्रुवारी रोजी रूहीनं एक इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यात तिनं फेक व्हॉट्सअॅप अकाउंटची माहिती दिली. तिनं पोस्टद्वारे पोलीस तक्रार दाखल करत असल्याची माहिती दिली. तसेच चाहत्यांना 6369584327 नंबर त्वरीत ब्लॉक करून तक्रार करण्याचे आवाहन केले. रूहीने स्पष्ट केले की, त्या चॅट्स तिच्या नाहीत आणि नंबरही तिचा नाही. फसवणूक करणारा व्यक्ती तिच्या नावाचा वापर करून लोकांशी चॅट्स करत आहे. या नंबरवर अजिबात विश्वास ठेवू नका, असं तिनं सांगितलं. या चॅट्समध्ये ती व्यक्ती कुणाशीतरी फोटोशूटबद्दल गप्पा मारत असल्याचं दिसून येत आहे.
इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करताना रूहीनं लिहिले की, कुणीतरी तिच्या ओळखीचा वापर करून लोकांना मेसेज पाठवत आहेत. तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिनं स्पष्ट इशारा देत लिहिले की, 'ही मी नाही. जर तुम्हाला कुणीही संशयास्पद नंबरवरून मेसेज पाठवले, तर कृपया त्यांना ब्लॉक करा'. तिनं पुढे नाराजी व्यक्त करत लिहिले की, 'एखाद्याची ओळख चोरत आहात? काहीतरी चांगलं काम करा. तुमचे आयुष्य जगा. मी पोलीस तसेच सायबर क्राइमकडे तक्रार दाखल करत आहे, असं तिनं पोस्टमध्ये म्हटलं.
रूही सिंह ही एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिचा जन्म जयपूरमध्ये झाला. तिनं 2015 साली मधुर भांडारकार यांच्या कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिला अद्याप इंडस्ट्रीमध्ये फारशी ओळख मिळाली नाही. या कारणामुळे ती प्रकाशझोतात आली आहे.
