Maval ZP and Panchayat Samiti Election Results 2026: मावळ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने घवघवीत यश मिळवले आहे. मावळ जिल्हा परिषदेच्या (Maval ZP Election 2026) 5 आणि पंचायत समितीच्या सर्व 10 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी विजयी झाले. या विजयाच्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी मावळमधील आपले वर्चस्व पुन्हा एकदा दाखवून दिले. मात्र, या विजयानंतर कौतुक करायला अजित पवार हयात नसल्याने सुनील शेळके भावूक होताना दिसले. (Maharashtra Politics news)
अजितदादा असते तर आम्ही आज विजयोत्सव साजरा केला असता. या कठीण परिस्थितीमध्येही मावळच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली. अजित पवार यांनी मावळच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी दिला, त्या कामांनाही सुरुवात झाली. आजचा निकाल म्हणजे अजित पवार जनतेने अजित पवार यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करणे आहे, असे सुनील शेळके यांनी म्हटले. मात्र, यावेळी अजितदादांचा विषय निघताच सुनील शेळके यांचे डोळे पाणावले. अजितदादांच्या आठवणीने त्यांना पुढे फार बोलता आले नाही.
दरम्यान, आटपाडी तालुक्यातील करगणी जिल्हा परिषद गटातून अजित पवार राष्ट्रवादीचे विनायक मासाळ विजयी झालेत. अजित पवार यांनी स्वतः विनायक मासाळ यांची उमेदवारी जाहीर करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा द्यायला सांगितलं होतं. जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर केली , मात्र आज माझा विजय बघायला ते हयात नाहीत याचं मोठं दुःख असल्याची भावना विनायक मासळ यांनी बोलून दाखवली.
आणखी वाचा
