Masaba Gupta,Vivian Richards : वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्सचा  (Vivian Richards) 70 वादिवस साजरा करण्यात आला. विवियनच्या आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांच्या नात्याची चर्चा नेहमी होत असते. मसाबा गुप्ता (Masaba Gupta) ही नीना आणि विवियन यांची मुलगी आहे. मसाबा ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे.  विवियनच्या वाढदिवसानिमित्त मसाबानं नुकताच एक खास फोटो शेअर केला. 


मसाबानं तिच्या वडिलांसोबतचा फोटो शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहीलं, 'अँटीगुआमध्ये माझ्या वडिलांचा वाढदिवस साजरा केला. गोल्फ टूर्नामेंट ही त्यांची क्रिकेटच्या मैदानानंतरची आवडती गोष्ट आहे. हेल्थ केअर कर्मचाऱ्यांसाठी ते मदत करत आहेत. ' मसाबानं शेअर केलेल्या पोस्टला तिच्या बेस्ट फ्रेंडनं म्हणजेच रेहा कपूरनं, 'genes'अशी कमेंट केली आहे. तसेच  करण बुलानी, टिस्का चोप्रा आणि ईशा गुप्ता या सेलिब्रिटींनी देखील मसाबाच्या फोटोला कमेंट केली. काहींना या फोटोला,  'लेजंड', अशी कमेंट केली आहे. फोटोमध्ये मसाबा ही व्हाईट ड्रेस, स्किन कलरचे शूज आणि डोळ्यावर गॉगल अशा क्लासी लूकमध्ये दिसत आहे.


मसाबाचे आगामी प्रोजेक्ट्स


मसाबा तिच्या हिट नेटफ्लिक्स शो मसाबा मसाबाच्या दुस-या  पार्टमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे.  तसेच अॅमेझॉन प्राइम इंडियावरील मॉडर्न लव्ह मुंबईच्या एपिसोडमध्येही ती दिसणार आहे.






गेल्या वर्षी अभिनेत्री नीना गुप्ता  यांचे 'सच कहूं तो' हे पुस्तक लाँच झाले. या पुस्ताकामध्ये नीना यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बरंच काही लिहीले आहे. नीना गुप्ता जेवढ्या अभिनयामुळे चर्चेत असतात, तेवढ्याच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत जातात. क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत रिलेशनशिप, लग्नाआधीची प्रेग्नंसी, नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील अनेक पैलू कधी वादग्रस्त, तर कधी चर्चेचा विषय ठरले आहेत. 


हेही वाचा :