Marathi Thriller Movie: मराठीतील नेहमीच्या धाटणीपेक्षा काहीसा वेगळा आणि अंगावर काटा आणणारा थ्रिलर पाहायचा असेल, तर हा चित्रपट नक्कीच तुमच्या वॉचलिस्टमध्ये असायला हवा. अभिनेता जितेंद्र जोशीची ( Jitendra Joshi) प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट दाट जंगल, माओवादी बंडखोर, पोलीस आणि या संघर्षात अडकलेले आदिवासी यांच्या भोवती फिरणारा आहे. चित्रपटाची कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवते. कोणत्या चित्रपटाविषयी आपण बोलतोय? जाणून घेऊया...

Continues below advertisement

जंगलात सुरू होतो जीवघेणा ‘कॅट अँड माऊस गेम’

'घात' (Ghaath) असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटाची कथा मध्य भारतातील माओवाद्यांचा प्रभाव असलेल्या घनदाट जंगलात घडते. इथे प्रत्येक वाट धोकादायक आहे.  कोणावर विश्वास ठेवायचा, हेच समजत नाही. पोलीस, माओवादी बंडखोर आणि आदिवासी यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात प्रत्येकजण आपापल्या अस्तित्वासाठी लढताना दिसतो. सिनेमाची कथा तीन भागांमध्ये उलगडते आणि  जल,जंगल जमीन या तीन घटकांभोवती फिरते. प्रत्येक भागात एक प्रमुख व्यक्तिरेखा आहे आणि पुढे या सगळ्यांच्या कथा एकमेकांशी जोडल्या जातात.

‘घात’मध्ये केवळ पोलीस आणि माओवादी यांच्यातील संघर्ष दाखवलेला नाही, तर विश्वासघात, सूड, भीती आणि माणसाच्या जगण्याची धडपड यांनाही महत्त्व दिलं आहे.या कथेत कोण मित्र आणि कोण शत्रू, हे ओळखणं अनेकदा कठीण होतं. एका क्षणी शिकारी असलेली व्यक्ती दुसऱ्याच क्षणी शिकार बनू शकते. त्यामुळे चित्रपटाचा थरार केवळ बंदुकीच्या गोळ्यांमध्ये नाही, तर पात्रांच्या निर्णयांमध्येही दडलेला आहे. त्यामुळे शेवटपर्यंत या चित्रपटाचे कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवतं. 

Continues below advertisement

जितेंद्र जोशी आणि मिलिंद शिंदे यांचा दमदार अभिनय

चित्रपटातील कलाकारांनी आपल्या भूमिकांना नैसर्गिक पद्धतीने साकारलं आहे.जितेंद्र जोशी यांनी ACP अमित नागपुरेची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. तर मिलिंद शिंदे यांनी बंडखोर नेता रघुनाथ पोटांबीची भूमिका साकारली आहे.  त्यामुळे ‘घात’ हा नेहमीच्या मनोरंजनापेक्षा वेगळा अनुभव देणारा स्लो-बर्न थ्रिलर ठरतो.

कुठे पाहता येणार ‘घात’?

छत्रपाल निनावे दिग्दर्शित ‘घात’ Amazon Prime Video वर पाहता येऊ शकतो. जंगल, माओवादी संघर्ष, पोलीस आणि आदिवासींच्या जगण्याची गोष्ट सांगणारा हा चित्रपट नेहमीच्या फॉर्म्युलापेक्षा वेगळा थ्रिलर पाहू इच्छिणाऱ्या प्रेक्षकांसाठी नक्कीच खास ठरू शकतो.