Natya Parishad Awards :  नाट्य परिषदेच्या व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकांसाठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये संकर्षण कऱ्हाडे आणि अमृता देशमुख मुख्य भूमिकेत असलेल्या नियम व अटी लागू या नाटकाला देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे याच नाटकासाठी संकर्षणचा सर्वोत्कृष्ट लेखक म्हणूनही सन्मान करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण 14 जून रोजी करण्यात येणार असल्याची माहिती नाट्य परिषदेकडून देण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल येथे हा सोहळा पार पडणार आहे. मराठी रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक म्हणून रंगशारदा प्रतिष्ठान या संस्थेच्या 'डबल लाईफ' या नाटकाची निवड करण्यात आली


विजेत्यांची संपूर्ण यादी 
व्यावसायिक विभाग


 सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक - नियम व अटी लागू
सर्वोत्कृष्ट व्यावसायिक संगीत नाटक - 'डबल लाईफ'
सर्वोत्कृष्ट लेखक - संकर्षण कऱ्हाडे (नाटक - नियम व अटी लागू)
व्यावसायिक दिग्दर्शक - चंद्रकांत कुलकर्णी (नाटक - नियम व अटी लागू)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - संकर्षण कऱ्हाडे (नाटक -नियम व अटी लागू) 
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता -मयुरेश पेम (नाटक -ऑल द बेस्ट)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार - आशुतोष गोखले (नाटक - जर तर ची गोष्ट)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - लीना भागवत (नाटक - इवलेसे रोप)
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री - शलाका पवार (नाटक- हीच तर फॅमिलीची गंम्मत)
सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार - पर्ण पेठे (नाटक - चार चौघी)
 नेपथ्यकार विभागाचा पुरस्कार - संदेश बेंद्रे (नाटक - २१७ पद्मिनी धाम)
प्रकाश योजना पुरस्कार - अमोघ फडके (नाटक- जर तर ची गोष्ट)
 पार्श्वसंगीतकार पुरस्कार - सौरभ भालेराव (नाटक - आजीबाई जोरात)
रंगभूमीवरील रंगभूषाकार पुरस्कार -  उल्लेश खंदारे (नाटक - कुर्र )


 प्रायोगिक विभाग


 सर्वोत्कृष्ट संगीत नाटक पुरस्कार - परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई या संस्थेच्या 'संगीत जय जय गौरीशंकर' नाटकास. 
सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक पुरस्का - नवी मुंबईच्या शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान, नवीमुंबई या संस्थेच्या  'i m पुंगळ्या शारूक्या आगीमहूळ' या नाटकास. 
प्रायोगिक नाटकातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - बकुळ धवने (नाटक - दि फिअर फॅक्टर) 
सर्वोत्कृष्ट  प्रायोगिक संगीत नाटकातील  सर्वोत्कृष्ट गायक अभिनेता -   विशारद गुरव (नाटक - संगीत जय जय गौरीशंकर)
संगीत नाटकातील सर्वोत्कृष्ट गायक अभिनेत्री - शारदा शेटकर (नाटक -संन्यस्त खड्ग)
सर्वोत्कृष्ट लेखक पुरस्कार - इरफान मुजावर                                          


ही बातमी वाचा : 


Priyanka Barve :अदिती राव हैदरला पसंती ते पण प्रियांका बर्वेची विना ऑडिशन निवड, नकारही दिला तरी कशी मिळाली 'मुघल-ए-आझम'ची अनारकली?