Ranti Film: ज्याच्या हातात पॉवर त्याच्या हातात सत्ता... पाताळ पुरातून आलेला माणूस परत जात नाही... रक्ताचा थेंबाची किंमत चुकवेन अशा दमदार संवादासह तुफान ॲक्शन, सूडनाट्य आणि अँग्री यंग मॅन एटीट्यूडमध्ये रानटी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. 22 नोव्हेंबरला रिलीज झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची दाद मिळत असून अभिनेता शरद केळकरसह आपल्या खलनायकी अवतारात समोर आलेले संजय नार्वेकर आणि इतर कलाकारही प्रेक्षकांचा थरकाप  उडवत आहेत. पुनीत बालन स्टुडिओ यांची निर्मिती आणि समित कक्कड दिग्दर्शित रानटी हा सिनेमा मराठीतील अलीकडच्या काळात आलेला सर्वात मोठा ॲक्शन पट ठरतोय. 


दमदार संवाद, कापाकापी फुल ॲक्शन..


कुठल्याही ॲक्शन चित्रपटाचे यश त्यातील दमदार ॲक्शन, संवाद आणि कथेतील गुंतागुंतीच नाट्य यावर अवलंबून असते. शरद केळकर याचा अँग्री यंग मॅन लुक ला प्रेक्षकांची  पसंती मिळत आहे. विष्णू नावाने ओळखतात आणि नरसिंह म्हणून घाबरतात हा त्याचा डायलॉग सध्या फेमस होत आहे. रानटी चित्रपटात पातळ पुरात जन्माला आलेला पाताळपुरातच मरतो... असे एक सो एक डायलॉग ट्रेलर मध्येच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत होते. अनेक रोमांचक दृश्य, ॲक्शनचा तडका आणि मनोरंजनाचा तगडा डोस असणारा रानटी चित्रपट 22 नोव्हेंबरला चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. 


काय आहे स्टारकास्ट? 


नायक आणि खलनायक यांच्या आता रंगणार सूडनाट्य असणारी कथा आणि रोमान्सच्या साथीने खुलत जाणारा कथेतला ड्रामा प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. रानटी चित्रपटात नायकाच्या भूमिकेत शरद केळकर दिसत आहे तर खलनायकाच्या अवतारात संजय नार्वेकर याचा लुकही प्रेक्षकांना आवडला आहे. याशिवाय चित्रपटात सानवी श्रीवास्तव, छाया कदम, नागेश भोसले, सुशांत शेलार, हितेश भोजराज, संजय खापरे, जयवंत वाडकर, अक्षया गुरव, कैलाश वाघमारे, माधव देव चाके, ज्ञाननाथ मुके हे कलाकार झळकणार आहेत. रानटी चित्रपटाचं लेखन अभिनय आणि गीत संगीत या सर्वच बाजू प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत.