Zol Zaal : कोरोनाच्या दोन लसीनंतर हास्याचा एक बूस्टर डोस घेऊन ‘झोलझाल’ (Zol Zaal) हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवायला सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना मनमुरादपणे हसायला लावण्यास अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत आणि 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत निर्माते गोपाळ अग्रवाल निर्मित 'झोलझाल' हा चित्रपट आज सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी किती रुचकर असणार, हे आपण चित्रटातील ठसकेदार गाण्यांनी आणि चित्रपटाचा ट्रेलरने पहिलीच आहे.


मात्र, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या कमर्शिअल चित्रपटाने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं आहे, यांत शंकाच नाही. ‘झोलझाल’ या चित्रपटात तब्बल 22 कलाकारांनी मिळून जो काय गोंधळ घातलाय, तो खरंच पाहण्यासारखा आहे. एका महालाभोवती फिरणारी या चित्रपटाची कथा, तो महल मिळवण्यासाठी कोण काय काय आणि कसे कसे ‘झोलझाल’ करतंय हे चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे.


सोशल मीडियावर गाण्याचा धुमाकूळ!


'झोलझाल' चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. हास्याची कारंजे घेऊन हे कलाकार रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज झाले आहेत. या चित्रपटातील गाण्यांनी सोशल मीडियावर आधीच धुमाकूळ घातला असून वैशाली सामंत, अवदूत गुप्ते, आदर्श शिंदे या फेमस गायकांच्या स्वरात स्वरबद्ध केलेली गाणी थिरकायला भाग पाडतायत.


एक-दोन नव्हे तब्बल 22 कलाकारांची धमाल!


या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, उदय टिकेकर, सयाजी शिंदे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, उदय नेने, अंकुर वाधवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे सिनेकलाकार दिसणार असून, या कलाकारांच्या भूमिका चित्रपटांत निव्वळ पर्वणीच ठरल्या आहेत. तब्बल 22 कलाकारांनी एकत्र येऊन या चित्रपटात नेमका काय धिंगाणा घातलाय, हे आजपासून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.


संबंधित बातम्या


Zol Zaal : रसिकांना मिळणार हास्याची नवी मेजवानी, 'झोलझाल' चित्रपटाची धमाकेदार गाणी रिलीज!


Zol Zaal : मल्टीस्टारर 'झोलझाल' सिनेमाचे पोस्टर आऊट; 1 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित