Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीने आपल्या कारकिर्दीत मराठी मालिकांसह चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अभिनेत्री प्रोफेशनल तर, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अलिकडेच अभिनेत्रीने मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने विविध विषयांवर चर्चा केली. सध्या इन्फ्लुएंसर (Influencer) लोकांचा जमाना आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इन्स्टाग्रामवर (Instagram) बरेच इन्फ्लुएंसर व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान, तेजश्री प्रधानचा (Tejashree Pradhan Influencer) आवडता इन्फ्लुएंसर कोणता? याबद्दल तिने मुलाखतीत सांगितलं.
तेजश्री प्रधानचा आवडता इन्फ्लुएंसर कोणता? (Tejashri Pradhan Reveals Her Favourite Influencers)
तेजश्री प्रधानने अलिकडेच सीने तडका 2.Oला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत अभिनेत्रीने अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्रीला नेमकं कोणता इन्फ्लुएंसर आवडतो? याबद्दलही तिने मुलाखतीत माहिती दिली. तेजश्री प्रधान म्हणाली की, 'सायली राऊत ही माझी आवडती इन्फ्लुएंसर आहे. मला सायली राऊतचे व्हिडीओ इतके आवडतात. मी तिचे व्हिडीओ खूप एन्जॉय करते. कारण आपल्या व्हिडीओसाठी ती जे कोणतेपात्र साकारते, त्या पात्रांबाबत तिचा खूप अभ्यास असतो'.
'एखाद्या कलाकाराचा अभ्यास कमी पडेल, अशी छान लकब तिने घेतलेली असते. मला तिचे व्हिडीओ बघताना खूप मज्जा येते', असं तेजश्री प्रधान म्हणाली. सायली राऊत व्यतिरिक्त अभिनेत्रीला आणखी काही इन्फ्लुएंसर आवडतात. अभिनेत्री म्हणाली, 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओज आवडतात. मला सुमीत पाटीलचे व्हिडीओज आवडतात', असं मुलाखतीत तेजश्री प्रधान म्हणाली. अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेमुळे चर्चेत आहे. या मालिकेत सुबोध भावे मुख्य भूमिकेत आहेत. ऑन - एअर गेल्यापासून तेजश्री प्रधानच्या मालिकेची विशेष चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
