Rahul Gandhi Riteish Deshmukhs Post: काँग्रेस नेता राहुल गांधी (Rahul gandhi) यांनी मंगळवारी अभिनेता रितेश देशमुखची (Riteish Deshmukh) पोस्ट आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर शेअर केली आहे. रितेश देशमुखने काल एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहे. रोमँटिक फोटोमध्ये रितेश देशमुखच्या मांडीवर जेनेलिया बसली असल्याचं पाहायला मिळत आहे. ती प्रेमाने रितेशला भरवत आहे. फोटो व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या फोटोची तुलना सोनिया गांधी (Socia gandhi) आणि राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्याशी केली. काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी सांगितले होते की, त्यांची आई सोनिया गांधी अनेकदा जेवताना वडील राजीव गांधी यांच्या मांडीवर बसत होते. यानंतर राहुल गांधी यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. अशातच रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखची पोस्ट व्हायरल झाली. राहुल गांधींनी रितेशची पोस्ट शेअर केली आहे.
राहुल गांधींनी शेअर केली रितेश देशमुखची पोस्ट (Rahul Gandhi Shares Riteish Deshmukhs Romantic Post with Genelia)
राहुल गांधी यांनी फोटो शेअर करत बॅकग्राऊंडला, शाहरुख खानच्या आगामी 'किंग' या सिनेमातील 'तु मिल जाए' हे ट्रेंडिग गाणं जोडलं आहे. सध्या इंटरनेटवर या फोटोची विशेष चर्चा होत आहे. रितेश देशमुखने हा फोटो मंगळवारी शेअर केला होता. रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया देशमुख एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये दिसत आहेत. रितेश देशमुख एका खुर्चीवर बसला आहे. तर, जेनेलिया त्याच्या मांडीवर बसली असल्याचं दिसत आहे. जेनेलिया आपल्या नवऱ्याला प्रेमाने पिझ्झा भरवत आहे. तसेच समोर असलेल्या टेबलवर भरपूर जेवण ठेवलेलं आहे. रितेश देशमुखने फोटो शेअर करत रोमँटिक कॅप्शन दिलं आहे.
रितेश देशमुखने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'टेबल दोघांसाठी, एकासाठी खूर्ची', असं म्हटलं आहे. राहुल गांधींनी त्यांच्या आई - वडिलांच्या नात्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर ही पोस्ट केली आहे. राहुल गांधी म्हणाले होते की, 'जेवणाच्या प्रत्येक वेळी, वडील तिथे असायचे, आणि माझी आई त्यांच्या मांडीवर बसलेली असायची. मला ही नॉर्मल गोष्ट वाटली होती. पण जेव्हा मी मित्रांकडे जात होतो. तेव्हा त्यांचे पॅरेंट्स असं काही करत नव्हते', असं राहुल गांधी म्हणाले. यानंतर राहुल गांधी यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
