Marathi actress Surekha Kudchi : बॉलिवूड अभिनेत्रींनी (Bollywood Actress) आजवर अनेकदा त्यांचे Casting couch अनुभव सांगितले आहेत. अनेकदा दिग्दर्शकांकडून, अभिनेत्यांकडून शरिरसुखाची मागणी करण्यात आल्याचा खुलासा बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी केला आहे. दरम्यान, मराठी सिनेसृष्टीत देखील असे प्रकार घडले आहेत. मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सुरेखा कुडची (Surekha Kudchi) यांनी याबाबतचा खुलासा केला आहे. 'राजश्री मराठी'ला दिलेला मुलाखतीत त्यांनी खळबळजनक खुलासे केले आहेत. 

सुरेखा कुडची म्हणाल्या, मी जेव्हा सिनेसृष्टी काम करण्यासाठी आले होते. म्हणजे सुरुवातीच्या काळात मला या क्षेत्रातील काहीच माहिती नव्हतं. मी अनुभव सांगते आहे, त्यातून नवीन मुलींनी बोध घ्यावा असं बरचं आहे.  तेव्हा, आराम नगरच्या भागात अनेक ऑफिस असायचे.  मी त्याठिकाणी ऑडिशनला जायचं ठरवलं होतं. त्यातल्या एका ऑफिसमध्ये भूताच्या चित्रपटांची पोस्टर्स लावण्यात आली होती. त्या फिल्म्स सी ग्रेड होत्या. आता इंडस्ट्रीत नवीन असल्याने मला तेव्हा ‘ए ग्रेड’, ‘सी ग्रेड’ म्हणजे काय असतं मला काहीच माहिती नव्हतं. त्या चित्रपटात काम करणारे तीन-एक जण ओळखीचे होते. त्यामुळे मला वाटलं मी योग्य ठिकाणी आले होते.

'एका रात्रीचे किती घेणार?'

पुढे बोलताना कुडची म्हणाल्या, मला विचारण्यात आलं होतं. एका रात्रीचे किती घेणार? हा प्रश्न केला त्यांनी... हे मी खरोखर माझ्याबाबतीत घडलेला किस्सा सांगत आहे. मी मग पटकण बोलले तुम्ही जेवढे द्याल तेवढी घेईल, असा थरारक अनुभव सुरेखा कुडची यांनी सांगितलाय. हे त्यांनी विनोदी पद्धतीने सांगितलं. मात्र, अतिशय खळबळजनक खुलासा त्यांनी यावेळी केला. सिनेसृष्टीत सुरुवातीच्या काळात अभिनय करण्यासाठी आल्यानंतर अनेक वाईट अनुभव आल्याचं कुडचींनी सांगितलं. 

तुम्हाला लीड रोल देतोय पण, तुम्ही आम्हाला काय देणार?

“मी तिथे जाऊन संबंधितांना भेटले. त्यांनी मला विचारणा केली की, आम्ही तुम्हाला लीड रोल देतोय पण, तुम्ही आम्हाला काय देणार आहात? सुरुवातीच्या काळात असे अनेक धक्कादायक अनुभव मला आले होते. मात्र, नंतरच्या काळात कोणाची अशी  विचारणा करण्याची हिंमत झाली नाही.  जेव्हा मी नवीन होते, तेव्हा मला असे अनुभव आले", असंही कुडची यांनी नमूद केलं. 

सुरेखा कुडची यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये उत्कृष्टपणे अभिनय केलाय. त्यांच्या टीव्ही मालिकांतील भूमिका आजही प्रेक्षक वर्ग विसरलेला नाही. देवयानी मालिका त्यांची सर्वात हिट मालिका मानली जाते. याशिवाय त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलंय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लग्नापूर्वी शारिरीक संबंध ठेवणे योग्य की अयोग्य? ऐश्वर्या रायचं उत्तर चर्चेत

संतोष निखळ आहे, सध्या खूप ट्रोल होतोय, पण त्याला चुकीचा समजू नका; जुवेकरसाठी धनंजय पोवारची पोस्ट