Marathi actress Voting : लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Election 2024) पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पार पडली. या टप्प्यात महाराष्ट्रातील एकूण 13 मतदारसंघांचा समावेश होता. यामध्ये मुंबईतील सहा, धुळे, नाशिक, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, ठाणे, दिंडोरी, पालघर या मतदारसंघांचा समावेश होता. सामन्यांपासून ते दिग्गजांपर्यंत अनेकांनी त्यांच्या मतदानाचा हक्क यावेळी बजावला. यामध्ये अनेक सिनेकलाकारांचा देखील समावेश होता. पण यातच एका अभिनेत्रीला मात्रे तिच्या मतदानाचा हक्क बजावता आला नाही. विशेष म्हणजे या अभिनेत्री (Marathi Actress) मतदानासाठी 6 तासांचा प्रवास केला होता. 


झी मराठी वाहिनीवर सध्या पारु ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेय. यामध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे आणि प्रसाद जवादे हे मुख्य भूमिकेत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री मुग्धा कर्णिकही या मालिकेत अहिल्यादेवीची भूमिका साकारत असून ती प्रसादच्या आईच्या भूमिकेत आहे. दरम्यान मुग्धाला यावेळी मतदान करता आलं नसल्याचं तिच्या सोशल मीडियावरील पोस्टवरुन तिने सांगितलं आहे. नेमकं यामागे कारण काय त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


मुग्धाला मतदान का करता आलं नाही?


मुग्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने तिला मतदान का करता आलं नाही, त्याविषयी सांगितलं आहे. त्यामध्ये तिने म्हटलं की, केवळ मतदानासाठी मी तब्बल 6 तांसाचा प्रवास करुन आले. पण इतरांप्रमाणेच माझंही नाव मतदार यादीत सापडलं नाही. मी गेली 20 वर्ष सातत्याने मतदान करतेय. पण यंदाच्या वर्षात मला माझा हक्क बजावता आला नाही, असं म्हणत मुग्धाने तिची नाराजी देखील व्यक्त केली आहे. 


यंदा पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेकांची नावं मतदार यादीतून गायब होती. त्यावर अनेकांनी नाराजी देखील व्यक्त केली. पुण्यात पार पडलेल्या मतदानाच्या प्रक्रियेवेळीही गायिका सावनी रविंद्र आणि सुयश टिळक या दोघांनाही असाच अनुभव आला. त्याबद्दल या दोघांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आता मुंबईतील मतदानच्या प्रक्रियेवेळी देखील अभिनेत्रीला असाच अनुभव आला आहे.     


                                               


ही बातमी वाचा : 


Smita Jayakar : 'इतकी कामं करुन आजही जाहिरातींच्या ऑडिशनसाठी फोन येतात तेव्हा...', ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर यांनी व्यक्त केला संताप