Meghana Erande Swami Samarth Devotion Experience: मेघना एरंडे (Meghana Erande) ही सिनेइंडस्ट्रीतील मल्टी टॅलेंटेड  अभिनेत्री (Marathi Actress) आहे. तिनं मालिका तसेच व्हॉइजओव्हरमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनेत्री विविध चित्रपटांमध्येही झळकली आहे. मेघना एरंडे सध्या झी मराठी वाहिनीवरील 'सनई चौघडे' (Zee Marathi) या मालिकेमुळे चर्चेत आहे. या लोकप्रिय मालिकेत अभिनेत्री पमा ही व्यक्तीरेखा साकारत आहे.  या मालिकेत पमा ही व्यक्तीरेखा स्वामी समर्थ यांची मोठी भक्त असते. ती कायम आपले सुख दु:ख स्वामींजवळ सांगत असते. केवळ पमा नाही तर,  मेघना सुद्धा आपल्या खऱ्या आयुष्यात स्वामींची (Swami Samarth) मोठी भक्त आहे. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत मेघनाने स्वामी समर्थांच्या भक्तीबद्दल खास अनुभव सांगितला. 

Continues below advertisement

मेघना एरंडे स्वामी समर्थांची मोठी भक्त (Meghana Erande On Swani Samarth)

राजश्रीला दिलेल्या मुलाखतीत मेघनाने 'पमा' या व्यक्तीरेखाबद्दल सांगितले की, 'मी या मालिकेत पमा ही व्यक्तीरेखा साकारत आहे. पमा ही व्यक्तीरेखा स्वामी समर्थ यांची मोठी भक्त आहे. ही सर्वात मला आवडणारी गोष्ट आहे, कारण मला जे काही स्वामींबद्दल वाटतं, तेच पमालाही वाटतं. परंतु, पमा जेवढं व्यक्त करु शकते,  तेवढं मी व्यक्त होऊ शकत नाही.  आता मी ते पमाकडून शिकत आहे', असं अभिनेत्री म्हणाली. 

'माझ्याजवळ कायम स्वामींची एक लहान मुर्ती असते. मी स्वामींच्या मुर्तीसोबत फार नाही बोलायचे. पण जेव्हापासून पमा ही भूमिका साकारायला लागली, तेव्हापासून   मी सगळं त्यांच्यासोबत बोलायला लागले', असं मेघना म्हणाली.

Continues below advertisement

'आईचा नवस पूर्ण झाला, माझं चार महिन्यांत लग्न ठरलं' (Meghana Erande Swani Samarth Devotion)

'मी, आई आणि बाबा 2010मध्ये अक्कलकोटला गेलो होतो.  आईने तेव्हा स्वामींजवळ नवस बोलला होता.  मेघनाला चांगला नवरा मिळू दे, असा आईने नवस केला  होता.  तिथे एक अन्नछत्र आहे. तिथे आम्ही पोळ्या केल्या होत्या. आईचा नवस पूर्ण झाला. तेव्हा 4 महिन्यांत माझं ठरलं होतं', असा किस्सा अभिनेत्रीने शेअर केला होता. 

केवळ मेघना नसून तिचे वडीलही स्वामींचे भक्त (Meghana Erande Reveals Personal Connection with Swami Samarth)

मेघनाचे वडीलही स्वामींचे भक्त होते. अभिनेत्री म्हणते, 'माझे वडील हे स्वामींचे भक्त होते.  मला आता जे काही स्वामी माहित झाले, ते बाबांमुळेच माहित झाले.    ते कायम स्वामींजवळ सगळं सांगायचे. जे काही ते सांगायचे, ती गोष्ट पूर्ण व्हायची. मठातील संस्कृत श्लोकांच्या आणि गीता पठणाच्या क्लासेसमध्ये मी जायचे. माझ्या वडिलांनी स्वामी समर्थांचा जप लिहिला आहे', असं म्हणत मेघनाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

धुरंधर रणवीर सिंह अचानक नागपूरला पोहोचला, सरसंघचालक मोहन भागवतांसोबत रेशीम बागेत गुप्तभेट, नक्की काय घडलं?