Manasi Naik Ex Husband Second Marriage: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Entertainment Industry) लोकप्रिय अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) सध्या चर्चेत आहे, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे. काही दिवसांपूर्वी मानसी नाईक तिचं वैवाहिक आयुष्य आणि त्यानंतर नवऱ्यासोबतचे वाद यामुळे ती चर्चेत होती. अखेर दोघांनी लग्नाच्या काही दिवसांतच घटस्फोट घेतला आहे. अशातच आता मानसी नाईकचा एक्स हसबंड प्रदीप खरेरानं (Pardeep Kharera) आपलं दुसरं लग्न उरकलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, मानसी नाईकच्या एक्स हसबंडनं जिच्यासोबत आपली दुसरी लग्नगाठ बांधली आहे, तीसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्रीच आहे.
अभिनेत्री मानसी नाईक हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर प्रदीपनं काही दिवसांतच विशाखा पनवारसोबत साखरपुडा केला होता. त्यानंतर जवळपास एका वर्षानं दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. दोघांनी थाटामाटात आपली लग्नगाठ बांधली. दोघांच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
मानसी नाईक आणि बॉक्सर प्रदीप खरेरा यांनी लॉकडाऊनमध्ये आपली लग्नगाठ बांधलेली. लॉकडाऊन असूनही दोघांच्या लग्नाची चर्चा जोरदार रंगलेली. पण, काही दिवसांतच दोघांमधले वाद चव्हाट्यावर आलेले. त्यानंतर दोघांनी एकमेंकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. आता त्यानं आपलं दुसरं लग्न आटोपलं आहे.
मानसी नाईकसोबतचा संसार अल्पावधीतच मोडला
प्रदीप खरेरा हा मराठी उद्योगातील एक प्रसिद्ध चेहरा, जो अभिनयासोबतच इतर क्षेत्रांतही सक्रिय आहे. मानसी नाईकसोबतच्या वैवाहिक जीवनानंतर त्यानं आता नव्या जोडीदारासोबत लग्न केलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये प्रदीप आणि त्याची नववधू पारंपरिक वेशभूषेत दिसतेय. लग्नाच्या रिअल्समधील एक व्हिडीओमध्ये प्रदीप पत्नीला मंगळसूत्र घालताना दिसतोय. सोशल मीडियावर अनेकांनी प्रदीपला नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रदीप खरेराचं दुसरं लग्न थाटामाटात पार पडलं. हळद, मेहंदी, संगीत असे सर्व समारंभ थाटामाटात पार पडल्यानंतर दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर सर्वांनी प्रदीप खरेरा आणि विशाखा पनवारवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :