Mahima Chaudhary Marriage: नव्वदच्या दशकातील सौंदर्याची खाण असलेली अभिनेत्री महिमा चौधरीनं (Mahima Chaudhary) दुसरं लग्न (Mahima Chaudhary Second Marriage) आटोपलं आहे. महिमाच्या लग्नाचा (Mahima Chaudhary Wedding) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. महिमानं दिग्गज अभिनेते संजय मिश्रा (Actor Sanjay Mishra) यांच्यासोबत दुसरं लग्न केलंय. माध्यमांसमोरच दोघांनी एकमेकांना हार घातलेच, त्यासोबतच लग्नाच्या विधीही केल्या. महिमा चौधरी आणि संजय मिश्रा दोघेही आधीपासूनच विवाहित आहेत. तरीसुद्धा त्यांनी दुसरं लग्न का केलंय? खरंतर, हा एक प्रमोशनचा भाग आहे. माध्यमांसमोर लागलेलं दोघांचं लग्न म्हणजे, त्यांच्या आगामी सिनेमाचं प्रमोशन आहे. कलाकारांनी आपल्या फिल्मला लाईमलाईटमध्ये आणण्यासाठी हा प्रमोशनल फंडा आजमावलेला.  फिल्म 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' (Durlabh Prasad Ki Dusri Shadi) 19 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. गुरुवारी या सिनेमाचा ट्रेलर (Durlabh Prasad Ki Dusri Shadi Trailer) रिलीज करण्यात आला. 

Continues below advertisement

मंगलाष्टका सुरू होताच, महीमा चौधरी भांबावली

माध्यमांसमोर महिमा चौधरी आणि संजय मिश्रा यांच्या लग्नाचा स्टंट केल्यानंतर 'दुर्लभ प्रसाद की दूसरी शादी' फिल्मचा ट्रेलरी रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये आपल्या मुलाचं लग्न करण्यासाठी दुर्लभ प्रसाद (संजय मिश्रा) आधी स्वतः लग्न करतात. कारण, ज्या घरात मुलाचं लग्न ठरलेलं असतं, त्या मुलीचे कुटुंबीय एक अट ठेवतात की, दुर्लभ प्रसाद यांच्या घरात आधी कुणीतरी महिला असेल, तर आम्ही त्या घरात मुलीचं लग्न करणार. नाहीतर आम्ही आमची मुलगी देणार नाही. अशातच दुर्लभ प्रसाद यांच्यासाठी मुलगी शोधण्याचा घाट घातला जातो आणि तेव्हा फिल्ममध्ये एन्ट्री होते महीमा चौधरीची. जी सिगारेट ओढते, दारू पिते... पण दुर्लभ प्रसाद तिला सुधारण्याचा प्रयत्न करतात आणि तिथेच कथानक वळण घेतं. फिल्ममध्ये मोठा ट्वीस्ट येतो.  

ट्रेलरवर आल्यात दमदार प्रतिक्रिया 

ट्रेलरचा शेवट एका नाट्यमय ब्रेकअपनं होतो, ज्यामुळे दुर्लभ प्रसाद आणि महिमा चौधरी यांना वेगळं व्हावं लागतं. दोघांचा एक व्हिडीओ समोर येतो, जो त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या मोडतोडीकडे नेतो. चित्रपटात विनोद आणि भावना दोन्ही आहेत. ट्रेलरच्या आधी, चित्रपटाचा टीझर आणि पोस्टर चांगलाच गाजला होता. चाहते बऱ्याच काळापासून ट्रेलरची वाट पाहत होते, पण आज, निर्मात्यांनी अखेर ट्रेलर रिलीज केला आहे, ज्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mahima Chaudhary Invites Paparazzi Her Second Wedding: 52 वर्षांची महिमा चौधरी करतेय दुसरं लग्न; जाहीरपणे दिलंय निमंत्रण, VIDEO होतोय व्हायरल