Dyanada Ramatirthkar: 2025 वर्ष मनोरंजन सृष्टीसाठी खास आहे. या वर्षात अनेकांनी चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. काहींनी लग्नाची, काहींनी लहानग्या पाहुण्याची तर काहींनी त्यांच्या नव्या आयुष्यातील खास क्षणांनी चाहत्यांना अपडेट केलं. सध्या मनोरंजनसृष्टीतही लग्न समारंभाचं वारं वाहतंय. अगदी सर्वच कलाकारांच्या आयुष्यात घडणाऱ्या आनंदाच्या क्षणांना चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून प्रेक्षकांची मन जिंकणारी मराठमोळी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरची सध्या लगीनघाई सुरूय. ज्ञानदाने तिचं लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना एका पोस्टमधून दिली आहे. ' ठरलं ..कळवतो लवकरच !' अशी पोस्ट करत तिने लग्न ठरल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद देत तिचं अभिनंदन केलंय.
होणाऱ्या नवऱ्याबद्दल दिली हिंट
ज्ञानदा रामतीर्थकरच्या घरी नुकताच हिंदी सोहळा पार पडला. मेहंदी काढतानाचा एक खास व्हिडिओ शेअर करत तिने व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये होणाऱ्या नवऱ्याच्या नावाचं पहिलं अक्षर टाकलंय. # HD असं टाकत तिने हातावर सुंदर मेहंदी आणि मनात तो .. असं लिहित ही पोस्ट केलीय. ज्ञानदाच्या चाहत्यांमध्ये सध्या प्रचंड उत्सुकता आहे. तिचा होणारा जोडीदार नेमका कोण, ‘H’ या अक्षराने सुरू होणारं नाव कुणाचं असेल, आणि ती लग्नबंधनात कधी अडकणार असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर चर्चेत आहेत. अभिनेत्रीने दिलेल्या सूचनेनंतर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुतूहल अधिकच वाढलं आहे. आता सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागलंय. ज्ञानदा तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा चेहरा अखेर कधी उघड करणार, याची चाहत्यांना आतुरतेने प्रतीक्षा आहे.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ठरलं कळवतो लवकरच # HD Love असा हॅशटॅग वापरत चाहत्यांनी गुड न्यूज दिली आहे. ज्ञानदा लग्न करणार असल्याचं कळताच तिच्या अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसल्याचं दिसतंय. अनेक जण तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव विचारतात. अनेकांनी तिला तिच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ज्ञानदानी आजवर अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारले आहेत. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेने तिला प्रचंड लोकप्रियता दिली. सध्या ती लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत काव्य हे पात्र साकारत आहे. प्रेक्षकांचाही तिला चांगला प्रतिसाद मिळतोय.