Vaibhav Mangale On KBC 17 Kid Ishit Bhatt: 'कौन बनेगा करोडपती'मध्ये (Kaun Banega Crorepati) आलेल्या एका पाचवीतल्या मुलाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचं झालं असं की, गुजरातचा इशित भट्ट (Ishit Bhatt) 'कौन बनेगा करोडपती'शोमध्ये हॉटसीटवर बसलेला. त्यावेळी खेळ सुरू झाला आणि शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. पण, शोच्या सुरुवातीपासूनच हा मुलगा विचित्रपणे, अत्यंत उद्धटपणे बोलत होता. बिग बींशी आदरानं वागणं तर सोडा, साधं नीटही बोलत नव्हता. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि सारचेजण मुलाच्या विचित्र वागण्यावर प्रश्न उपस्थित करु लागले. त्याच्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. अशातच आता या संपूर्ण प्रकरणावर मराठी अभिनेत्यानं प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, त्यानं या संपूर्ण प्रकरणाची एक वेगळीच बाजू सर्वांसमोर मांडली आहे. 

Continues below advertisement

मराठी अभिनेते वैभव मांगले (Marathi actor Vaibhav Mangle) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करुन एक वेगळीच बाजू सर्वांच्या निदर्शनास आणून दिली आहे. तसेच, शंका उपस्थित करुन सर्वांना एका भीषण वास्तवाचीही जाणून करून दिली आहे. केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत, असं वैभव मांगले यांनी म्हटलं आहे.   

Continues below advertisement

काय म्हणाले अभिनेते वैभव मांगले? 

लोकप्रिय मराठी अभिनेते वैभव मांगले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत पोस्ट लिहित त्यामध्ये म्हटलंय, "केबीसीच्या प्रसिद्धीसाठी त्या मुलाचा वापर केला गेला असेल तर आपण एका भीषण वास्तवात आहोत. हकनाक त्या मुलाच्या भविष्याचा बळी दिला गेला. "

केबीसीमध्ये आलेल्या 'त्या' मुलाला मानसिक आजार?

संगीतकार कौशल इनामदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.  त्यात त्यांनी म्हटलंय ती, त्यांची पत्नी सुचित्रा एक मानसशास्त्रज्ञ आहे. कौशल इनामदारांनी सांगितल्यानुसार, त्यांनी हा व्हिडिओ पत्नीला दाखवला, त्यावर मुलाला ADHD म्हणजेच Attention Deficit Hyperactivity Disorder असावा अशी शक्यता व्यक्त केली. हा विकार साधारपणे बालवयापासून सुरू होतो. त्यानंतरही अनेक वर्षांपासून या मानसिक विकाराची लक्षणं राहतात. ज्यामध्ये मुल हायपर अॅक्टिव्ह असतं. वागणुकीत संतुलन राहत नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

KBC 17 Kid Ishit Bhatt May Facing Mental Illness: केबीसीमधला उद्धट मुलगा मानसिक आजारानं ग्रस्त? सुप्रसिद्ध मराठमोळ्या संगीतकाराच्या पोस्टनं वेधलं लक्ष...