Vaibhav Lakshmi Rajyog 2025 : वैदिक पंचांगानुसार, यंदाच्या दिवाळीला (Diwali 2025) अनेक शुभ योग (Yog) आणि राजयोग निर्माण होणार आहे. दिवाळीला यंदा वैभवाचा कारक चंद्र आणि लक्ष्मीचा दाता शुक्र ग्रहाची युती कन्या राशीत होणार आहे. यामुळे वैभव लक्ष्मी राजयोग (Rajyog)जुळून येणार आहे. हा राजयोग जुळून आल्याने काही राशींना अचानक धनलाभ होणार आहे. तसेच, प्रगतीचे अनेक योग जुळून येतील. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी वैभव लक्ष्मी राजयोग फार लाभदायी ठरणार आहे. हा राजयोग तुमच्या लग्न भावात होणार आहे. त्यामुळे या काळात तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच, तुमचं व्यक्तिमत्व उजळून निघेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. या काळात तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घटून येतील. नातेसंबंध घट्ट होताना दिसतील. या काळात मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला अनेक कामे पूर्ण करता येतील. नवीन गोष्टीत गुंतवणूक करु शकता. 

मकर रास (Capricorn Horoscope)

वैभव लक्ष्मी राजयोग जुळून आल्याने मकर राशीचे चांगले दिवस सुरु होतील. हा राजयोग तुमच्या कुंडलीच्या भाग्यस्थानी जुळून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुम्हाला तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.                  

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी वैभव लक्ष्मी राजयोग फार लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या उत्पन्न आणि गुंतवणूर स्थानी हा राजयोग जुळून येणार आहे. त्यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळेल. लवकरच लॉटरी लागण्याची शक्यता आहे. पार्टनरबरोबर तुम्ही चांगली डीलदेखीलसुरुकरु शकता. तसेच, तुमच्या मुलांच्या संदर्भात तुम्हाला शुभवार्ता मिळेल. या दरम्यान तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय तुम्हाला देता येईल. नवीन गोष्टी शिकाल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :                    

Panchank Yog 2025 : तब्बल 12 वर्षांनी जुळून येणार गुरु-शुक्राचा पॉवरफुल 'पंचांक योग'; दिवाळीआधीच 'या' राशींना लागणार लॉटरी, मालामाल होतील राशी