Marathi actor Tushar Ghadigaonkar Death: छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमधून अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता तुषार घाडीगावकर (Tushar Ghadigaonkar) याने शुक्रवारी आत्महत्या करुन आयुष्याचा शेवट केला होता. तुषार घाडीगावकर याच्या आत्महत्येच्या वृत्ताने मराठी कलाविश्वात एकच खळबळ उडाली होती. या घटनेबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा होऊन कलाकारांच्या आर्थिक अडचणींचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला होता. या पार्श्वभूमीवर मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) यांनी एक सविस्तर पोस्ट लिहून आपले विचार व्यक्त केले आहेत. या पोस्टमधून विशाखा सुभेदार यांनी बेभरवशी अशा कला क्षेत्रात कलाकारांना आर्थिक अडचणींच्या काळात मदतीसाठी एखादा फंड असावा, अशी गरज व्यक्त केली. स्वतःचा संसार चालवण हे ज्याच्या त्याच कामं आहे पण टेकू तर देऊच शकतो. त्यासाठी काहीतरी स्कीम किंवा तरतूद आपण करु शकतो का, असा विचार विशाखा सुभेदार यांनी मांडला.
Tushar Ghadigaonkar Death: आमचं फिल्ड बेभरवशाचं, कलाकार निधी असं काही करता येईल का? तुषार घाडीगावकरच्या मृत्यूनंतर विशाखा सुभेदारांची पोस्ट व्हायरल
जयदीप मेढे | Rohit Dhamnaskar | 23 Jun 2025 01:47 PM (IST)
Tushar Ghadigaonkar Death: मराठी अभिनेता तुषार घाडीगावकर याने शुक्रवारी मुंबईतील त्याच्या घरी आयुष्याचा शेवट केला होता. कौटुंबिक कारणातून त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती.
vishakha subhedar
रंगभूमी बळ देते.. असं म्हणता म्हणता.. वाईट बातमी.. Tushar Ghadigaonkar ह्या रंगकर्मीची..!
खरंतर माझा मुलगा आणि हा एकाच कॉलेज चे.. अभिनय कडून अनेकदा त्याच नाव ऐकलेले... भेटले ही होते, काम नव्हतं केलं... पण भयानक वाईट घडले..
हिच जी phase येते त्या वेळीस बोलायला हव, मार्ग निघतो..
(एडिट करतेय )
मंडळी क्षमस्व
माहिती जी मला मिळाली ती अर्थिक अडचण अशी होती पण ते कारण नाहीय हे आत्ताच एक निकटवर्तीय मित्राने सांगितले.
त्याबद्दल मित्रा माफ कर मला..! तू ज्या परिस्थितीत हे पाऊल उचललं ते... वाईट झालं.
सांगो वांगी जे कानावर पडल त्यामुळे share कराव वाटलं.
पण तरीही माझा मुद्दा खोडवा असं वाटत नाहीय..
कलाकारांना अर्थिक अडचण आल्यानंतर काही मदत मिळावी ह्यासाठी फंड करावा असं खुप वाटतं.. नंतर ते पॆसे कमवून त्यांनी फेडावे..! सोसायटी मधून कसं लोन घेता येतं अगदी तसंच काहीसं कलाकार फंड करावा...
त्याची काहीतरी सिस्टिम असावी..
परतफेडीचे नियम नियोजन असावे. काहीतरी मार्ग असावा..!
रंगमंच कामगार संघटना आहे, जुनियर artist साठी त्यांची संघटना आहे.. संघटन फक्त त्याच्या वरच्या फळीतल्या कलाकारांच होत नाही.कारणं माहित नाही..! मदत करतात ही काही मित्र मैत्रिणी पण नंतर ते ही पाठ फिरवतात.त्याला दोषी ही काही कलाकार आहेतच जे पॆसे घेऊन गूल होतात..त्याच पैशांची दारू पितात. अनेकांनी अनुभवलं असेलच हे.. फार दुष्ट चक्र आहे हे..पण तरीही..काहीतरी मार्ग काढायला हवा..! ताकद, बळ, द्यायला हव.
हातात कामं नसताना पोटाची खळगी, कामाची भूक आणि नकारत्मक विचारांशी लढणं फार अवघड होऊन जात..
आमचं फिल्ड बेभरवशाच.. त्यामुळे ही phase प्रत्येकाला फेस करावीच लागते..
साहित्य,नाट्य, संमेलनसाठी दिला जातो त्यातुनच एक छोटासा भाग कलाकार निधी असं काही करता येईल का?? किंवा जसं नाटक सिनेमा जगावा म्हणून अनुदान असतं तस कलाकार जगावा, (प्रामाणिक पणा पडताळून घ्यावा हव तर) तर त्यासाठी वरदान/ जीवदान .. असं काही स्कीम करता येईल का?? एक भाबडा विचार..!
त्याला ही अनेक फाटे फुटतील च.. पण आत्महत्येच्या विचाराला तरी फाटा देता येईल.
पटतंय का कलाकार मित्र मैत्रिणी नों..???? ही वेळ कोणावरही येऊ शकते
पटत असेल तर चला काहीतरी मार्ग काढूया.
स्वतःचा संसार चालवण हे ज्याच्या त्याच कामं आहे पण टेकू तर देऊच शकतो
त्यासाठी काहीतरी स्कीम,प्रॉव्हिजन बांधू शकतो का आपण???
आणखी वाचा
Published at: 23 Jun 2025 01:47 PM (IST)