Sachin Pilgounkar On Urdu and Marathi Langauge: मराठी सिनेसृष्टीचे (Marathi Industry)) महागुरू, सचिन पिळगावकर (Sachin Pilgounkar) यांनी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदी (Hindi Movie) आणि मराठीत (Marathi Movie) अनेक सिनेमे केले. अगदी बालपणापासूनच इंडस्ट्रीत सक्रिय असलेले सचिन पिळगावकर अनेक मुलाखतींमध्ये बॉलिवूड, मराठी सिनेसृष्टीसंदर्भात अनेक किस्से सांगतात. तसेच, आपली मतंही मांडत असतात. अशातच सध्या सचिन पिळगावकर त्यांच्या एक वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यापूर्वी सचिन पिळगावकर यांना अभिनेत्री मीना कुमारी यांनी उर्दूचे धडे दिले होते, हे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. तसेच, आता एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मातृभाषा मराठी असली तरीसुद्धा त्यांचं उर्दूवर प्रचंड प्रेम आहे, असं सचिन पिळगावकर म्हणाले आहेत. 






सचिन पिळगावकर नेमकं काय म्हणाले? 


सचिन पिळगावकर नुकतंच 'बहार ए उर्दू' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी भावना व्यक्त करताना सचिन पिळगावकर म्हणाले की, "माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार उर्दू भाषेतून करतो... मला माझ्या बायकोनं किंवा कोणीही रात्री 3 वाजता जरी उठवलं, तरी मी उर्दू बोलून जागा होतो... मी केवळ उर्दूतून जागा होत नाही, तर मी उर्दूसोबत झोपतोही... माझं उर्दू भाषेवरील प्रेम माझ्या बायकोला आवडतं." तसेच, पुढे बोलताना सचिन पिळगावकर म्हणाले की, "उर्दू एक अशी सवत आहे जी माझ्या बायकोला आवडते."


अभिनेता सचिन पिळगावकर यांनी आपला काळ चांगलाच गाजवला. गायन, अभिनय, दिग्दर्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी यशस्वी पद्धतीने काम करून दाखवलंय. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक मराठी सिनेमे आजही तेवढेच चर्चेत असतात. विशेष म्हणजे त्यांनी अभिनाच्या प्रदेशात साकारलेली पात्रेही आज तेवढीच जिवंत वाटतात. विशेष म्हणजे बालकलाकार म्हणूनच त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. त्यातही राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळला होता. त्यामुळे, लहानपणापासूनच त्यांनी कर्तृत्वाच्या जोरावर सन्मान आणि गौरव मिळवला आहे.


दरम्यान, सचिन पिळगावकर 'नदिया के पार', 'बालिका वधू', 'पारध', 'बचपन', 'ब्रह्मचारी', 'सत्ते पे सत्ता' यांसारख्या बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकले. तर, 'अशीही बनवा बनवी', 'नवरा माझा नवसाचा', 'आयत्या घरात घरोबा' यांसारख्या अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Sachin Pilgaonkar On Laxmikant Berde: 'नवरा माझा नवसाचा सिनेमात मला लक्ष्याला घ्यायचं होतं, पण...'; लक्ष्मीकांत बेर्डेंनी का दिलेला सचिन पिळगांवकरांसोबत काम करायला नकार?