Hemant Dhomes Powerful Poem viral: प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेता आणि लेखक म्हणून प्रकाशझोतात आलेला कलाकार म्हणजे हेमंत ढोमे (Hemant Dhome). समाजात घडणाऱ्या घडामोडींवर हेमंत ढोमे हे पोस्ट शेअर (Cockroach Janta party) करत असतात. आपले मत मांडत असतात. सामाजिक असो किंवा राजकीय, हेमंत ढोमे आपलं परखड मत मांडत असतात. कॉकरोच जनता पार्टी आणि आंदोलकांच्या समर्थनार्थ हेमंत ढोमे यांनी पोस्ट (Viral Video) शेअर करत पाठिंबा दिला होता. जंतर मंतर येथे आंदोलन पार पडलं होतं. या आंदोलनाच्या समर्थनार्थ त्यांनी पोस्ट शेअर केली होती. दरम्यान, नुकतंच त्यांनी एक कविता सादर केली आहे. 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही', असे कविताचे नाव आहे. सध्या हेमंत ढोमे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
हेमंत ढोमे यांची कविता सोशल मीडियात व्हायरल (Hemant Dhomes Viral Post)
कविता सादर करत असताना हेमंत म्हणाले, 'गोळ्या घालणाऱ्यांना आजही नीट झोप येत नाही...एकोणिसशे अठ्ठेचाळीसला घातलेल्या गोळ्यांना आता अठ्ठ्याहत्तर वर्ष पूर्ण होतील...पण तरीही तो विचार काही केल्या मरत नाही...तो आजही सत्याच्या मार्गाने चालतो आहे...अहिंसेच्या वाटेवर जिंकतो आहे...एक गांधी मारला तरी, हजारो गांधी जन्म घेतात...कारण त्या गोळ्यांपेक्षा बहुदा...सत्याचा श्वास अधिक भेदक होता...इतिहासाच्या प्रत्येक पानावर एकच वाक्स कोरलं गेलंय...काळाच्या न्यायालयात हिंसेचा पराभव होतोच...नावं बदलतात, चेहरे बदलतात, पुन्हा गोळ्या घालण्याचा प्रयत्न करतात...पुन्हा लाठ्या - काठ्या चालवतात...पण गांधी पुन्हा जन्म घेतो...एकत्र येतो, लढतो, पुन्हा सत्याला जिंकवतो...आणि अठ्ठ्याहत्तर वर्ष उलटून गेली तरी...गोळ्या झाडणाऱ्यांना, आजही नीट झोप येत नाही!
हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी व्हिडीओला कॅप्शन देखील दिलं आहे. 'सत्यमेव जयते', असं त्यांनी कॅप्शन देत शेअर केलं आहे. त्यांच्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे. एका युझरने कमेंट सेक्शनमध्ये, 'हेमंत दादा तुमचे विचार इतर मराठी कलाकारांपेक्षा वेगळे आणि चांगले आहेत, हे कायम दिसून आलं आहे', असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
