Sanjay Shirsat: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात देशभरात तीव्र जनआक्रोश आणि 'जेन झी' (Gen Z) विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आक्रमक आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा (Resignation) दिला आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीसह देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

Continues below advertisement

एकीकडे या यशाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे भव्य 'तिरंगा रॅली' पार पडत असतानाच, दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये एक महत्त्वाची राजकीय आणि कौटुंबिक भेट पाहायला मिळाली. शिवसेना (शिंदे गट) नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेल्या अभिजीत दिपके (Abhijeet Dipke) यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-वडिलांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता संजय शिरसाट यांनी या भेटीमागचं नेमकं कारण सांगितलं आहे. 

Sanjay Shirsat: काय म्हणाले संजय शिरसाट?

"दिपके कुटुंबाशी आमचे नातेसंबंध आहेत. आंदोलनादरम्यान प्रकरणाला राजकीय वळण लागू नये म्हणून घरी आलो नव्हतो. आता अभिजीतच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो असून सरकार त्याची योग्य ती काळजी घेईल," अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलीय.

Continues below advertisement

Abhijeet Dipke Father Reaction: अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांची प्रतिक्रिया 

मंत्री शिरसाठ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे मनातील प्रश्न मिटला. आंदोलनादरम्यान राजकारण होऊ नये म्हणून आंदोलनाच्या काळात ते आले नव्हते. आंदोलनाला यश मिळाल्याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांचे वडील भगवान दिपके यांनी दिली आहे.

Sanjay Shirsat on Uddhav Thackeray: संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी 'दैनिक सामना'ला दिलेल्या मुलाखतीत इंडिया आघाडीबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. आघाडी ब्लॉक झाल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत विचारले असता संजय शिरसाट म्हणाले की, इंडिया आघाडी गेल्या लोकसभेनंतर ब्लॉक झाली, त्यांच्यात कुठेही एकवाक्यता नाही. दिल्लीच्या आंदोलनात देखील आपापले आंदोलन करीत श्रेय घेण्याची चढाओढ त्यांच्यात सुरू होती. आता इंडिया आघाडी राहिली नाही.  आता उद्धव ठाकरे यांना मान्य करावेच लागेल, असे त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...

Mumbai Tiranga Rally: कमबॅक करना पडेगा! मुंबईच्या तिरंगा मोर्चातील बाळासाहेब ठाकरेंचं जेन झी स्टाईल पोस्टर व्हायरल