Akshay Kelakar Father On Riksha Taxi Marathi Compulsion: राज्यात एक तारखेपासून परवानाधारक सर्व रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्ती करण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात संपूर्ण रिक्षाच्या टॅक्सी चालकांच्या संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिलाय.रेल्वे स्थानके, बस डेपो,निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करण्याचा पवित्रा घेतल्यानंतर सर्व स्तरातून रिक्षाचालक व टॅक्सी चालकांच्या आक्रमक पवित्र्यावर टीका होताना दिसतेय. कला विश्वातून अनेकांनी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. हेमंत ढोमेसह, रितेश देशमुख, शिव ठाकरे अंशुमन विचारे विशाल कोटियन अशा अनेकांनी महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे. अभिनेता अक्षय केळकरचे वडील रिक्षाचालक आहेत. या प्रकरणावर त्यांनी आपलं मत मांडलं आहे.या प्रतिक्रियेची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. (Akshay Kelkar)
अभिनेता अक्षय केळकरने विचारलं रिक्षाचालक वडिलांना मत
अभिनेता अक्षय केळकरने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.या व्हिडिओमध्ये त्याने रिक्षा चालकांच्या मराठी भाषेच्या सक्तीचा विषय मांडलाय. पण इतर सेलिब्रेटिंग प्रमाणे त्याने स्वतः यावर प्रतिक्रिया न देता त्याच्या रिक्षाचालक वडिलांची प्रतिक्रिया जाणून घेतली. या व्हिडिओत अक्षयचे वडील म्हणाले ' आम्ही मराठी बोलावं, आमच्या प्रांताची भाषा आहे हिंदी, आम्ही तीच बोलणार. पण महाराष्ट्रात ते चालणार नाही. कोरोना आला होता तेव्हा मराठी माणसाने सपोर्ट करून तुम्हाला तुमच्या गावाला पाठवलं होतं. मग आता तुम्हाला मराठी बोलायला काय झालं ? इथेच कमवता इथलेच पैसे इथूनच परत गावाला नेणार. मग गावाला जाऊन बोला हिंदीत ' असं ते म्हणाले .
ते पुढे म्हणाले 'थोडाफार जे काही येत असेल ते मराठीत बोला . मधल्या वेळेत तंबाखू वगैरे खाण्यापेक्षा मराठी रिक्षावाले असतात ,त्यांना चार प्रश्न विचारायचे.ते मित्र असतात, ते सांगतीलच तुम्हाला. नंतर तुमच्या घरी जाऊन हिंदी बोला. काही गाड्यांना दोन परमिट आहेत.काही गाड्यांना एकही नाही. पण त्या गाड्या चालतात. तीन तीन परवाने असणाऱ्या रिक्षा चालतात कशा हे अधिकाऱ्यांना विचारायला हवं. त्यांनी तपासलं असतं तर हे झालंच नसतं. तुम्ही पेपर चेक केले तर कुठल्या हिशोबाने केले ? आता नोकऱ्या नाहीयेत त्यामुळे अनेक जण रिक्षा चालवायला उत्सुक आहे. त्यांना परमिट दिलं तर ते तयार आहेत. ' असं ते म्हणाले.
