एक्स्प्लोर

गावखेड्यातही ऑनलाइन जुगाराचं फॅड, तरुणाने अख्ख कुटुंब संपवलं; अभिनेता स्वप्नील जोशी म्हणाला, मी जाहिरात सोडली

काकड आरती, भजन, कीर्तनाचे बोल ग्रामीण महाराष्ट्रात गावागावात कानी पडायचे. मात्र, आलीकडच्या काळात मोबाईलच्या अतिरेकी वापराने गावचे हे गावपण हिरावलं गेलं.

धाराशिव : ऑनलाइन जुगारात (Gambling) ग्रामीण महाराष्ट्र पोखरला जात असून शाळा महाविद्यालयातील तरुण, मजूर, शेतकरी अनेकांच्या डोक्यात या जुगाराची किड गेल्याचं पाहायला मिळत आहे. मोबाईलमधून तरुणाईला विळख्यात ओढणारा जुगार थांबवणे पोलिसांनाही अवघड बनत आहे. या जुगाराच्या आहारी गेलेल्या तरुणाने धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यातील बावीमध्ये अडीच वर्षाच्या कोवळ्या मुलासह पत्नीला विष पाजून संपवल्याची ह्रदयद्रावक घटना काही दिवसांपूर्वी घडली. विशेष म्हणजे नंतर स्वत:ही गळफास घेत तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यामुळे, या जुगाराच्या गेम्सची जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींच्या भूमिकेवरही प्रश्न उभे राहतात. त्यापैकीच एक असलेल्या स्वप्नील जोशीने (Swapnil joshi) आपण ही जाहिरात करणं बंद केल्याची माहिती दिली. 

काकड आरती, भजन, कीर्तनाचे बोल ग्रामीण महाराष्ट्रात गावागावात कानी पडायचे. मात्र, आलीकडच्या काळात मोबाईलच्या अतिरेकी वापराने गावचे हे गावपण हिरावलं गेलं. माणूस माणसापासून दूर गेला, अबोल झाला. स्वतःमध्येच गुरफटणाऱ्या या माणसांच्या डोक्यात मोबाईलमधून आता ऑनलाइन जुगाराची कीड शिरली. शाळा, कॉलेजमधील तरुणाईसोबतच दररोज रोजंदारीवर जाणारे मजूर, शेतकरी देखील या ऑनलाइन जुगाराच्या विळख्यात ओढले गेले आहेत. सेलिब्रिटी ऑनलाइन जुगाराची जाहिरात करत असल्याने अधिक प्रभाव पडतो. धाराशिवच्या बावीमध्ये हसते खेळते कुटुंब ऑनलाइन जुगारामुळे उध्वस्त झालं आहे. महाराष्ट्रातील कित्तेक कुटुंबात तणावात आहे. कारण, ग्रामीण महाराष्ट्राला हा ऑनलाइन जुगार वाळवी सारखा पोखरतोय.

धाराशिवच्या बावीमधील एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा फोटो पाहून मन हेलावून जातं, फोटोत दिसणारे तिघेही आता या जगात नाहीत. ऑनलाईन जुगाराने यांची हत्या केलीय. ज्याच्यावर प्रेम केलं त्या पतीने, ज्याने जन्म दिला त्या बापानेच पोटच्या मुलाला संपवत आत्महत्या केली. लक्ष्मण जाधव असं या कुटुंबाच्या कर्त्या पुरुषाचे नाव, लक्ष्मण जुगारात ओढला गेला त्यात एवढा गुरफटून गेला की त्यामधून त्याला बाहेर पडताच आलं नाही. अगोदर लक्ष्मणने याच जुगारासाठी स्वतःची शेतजमीन विकली होती, घरासाठीची जागा विकली. मात्र, जुगाराची कीड एवढी खोलवर गेली की त्यामध्ये दोन वर्षाच्या पोटच्या लेकराची आणि पत्नीची हत्या करत लक्ष्मणने गळफास घेत जीवन संपवलं. 

प्रेमविवाह केला, पण जुगाराने कर्जबाजारी झाला

लक्ष्मण मारुती जाधव हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करत होता. त्याने तीन वर्षांपूर्वी गावातील तेजस्विनी (21) यांच्याशी प्रेम विवाह केला होता. त्यांना दोन वर्षाचा मुलगा होता. पोलिसांच्या सांगण्यानुसार लक्ष्मण जाधवने कर्जबाजारीपणातून स्वतःच्या मालकीची एक एकर जमीन तसेच गावातील प्लॉटिंगची जागा विक्री केली होती. त्यानंतरही तो तणावातून मुक्त झाला नव्हता. दरम्यान, त्याने 15 जूनच्या रात्री पत्नी तेजस्वीनी तसेच दोन वर्षाच्या मुलाला विष देऊन मारून त्यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली होती. या घटनेनं तरुणाईच्या डोळ्यात अंजन घातलं आहे, तरीही गावखेड्यातील तरुण पिढी या जुगाराच्य विळख्यातून बाहेर येताना दिसत नाही.  

मी 5 वर्षांपूर्वी ती जाहिरात केली - स्वप्नील जोशी

ऑनलाईन जुगाराची जाहिरात खेळाडू, सेलिब्रिटी करतात त्यामुळे त्याचा तरुणाईवर मोठा पगडा आहे. ऑनलाईन जुगाराची जाहिरात करणारा मराठी अभिनेता स्वप्निल जोशी याला ग्रामीण महाराष्ट्राबाबत विचारल्यावर त्याने आपण सध्या ती जाहिरात करत नसल्याचे म्हटले. 5 वर्षांपूर्वी आपण जंगली रम्मीची जाहिरात केली होती. आता, आपण ती थांबवली आहे, यापुढे ती जाहिरात करणार नसल्याचंही स्वप्निल जोशीने धाराशिव दौऱ्यावर असताना सांगितलं. मराठी कलाकार म्हणण्यापेक्षा मी अगोदर मराठी माणूस आहे, माणूस म्हणून मी तो निर्णय घेतल्याचंही जोशी यांनी सांगितले. 

हेही वाचा

मोठी बातमी : मंगेश चिवटे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याच्या तयारीत, मतदारसंघही ठरला?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?

व्हिडीओ

Pune Crime News : चोरट्यांनी चक्क 'Virtual Court' भरवलं! पुण्यात निवृत्त वृद्धाची १० कोटींची फसवणूक
Bhaskar Jadhav on Ramdas Kadam : गाढवाला गुळाची चव काय? रामदास कदमांच्या डोक्यावर परिणाम
Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
एकदा मी बोलायला सुरुवात केली की थांबत नाही हे आता त्यांना माहीत झालंय, त्यांची डाळ शिजणार नाही : पीएम मोदी
RBI MPC Meeting: आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
तब्बल 17 जणांची डीएनए चाचणी अन् जन्मदाता बापच बलात्कारी निघाला; पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या मूकबधिर मुलीची शोकांतिका, महाराष्ट्रात काय सुरुय?
Dharashiv News: दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
दोन दिवसांपासून येतायत गूढ आवाज, घरातील भांडी, दरवाजे खिडक्या हादरल्या; धाराशिवमध्ये नेमकं काय घडतंय?
Solapur Crime News: सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
सोलापुरातील मुलतानी बेकरीच्या मालकाचं टोकाचं पाऊल; 17 व्या मजल्यावर गेले, हात जोडून प्रार्थना केली अन्...
Pimpri Chinchwad Deputy Mayor: राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेणार?
Rajpal Yadav Surrenders In Cheque Bounce Case: राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
अभिनेता राजपाल यादवचं तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण, प्रकरण नेमकं काय?
Chhatrapati Sambhajinagar News: खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडले?
खेचले, पाडले, रस्त्यावरुन तरुणीला ओढत नेले; तरुण-तरुणीचा व्हिडीओ व्हायरल, छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget