Abhijeet Bichukale Reacts to Dhurandhar Craze: महिना उलटून गेला. तरीही धुरंधर सिनेमाची क्रेझ काही केल्या कमी होत नाहीये. या चित्रपटातील सीन्स आणि कलाकारांनी प्रेक्षकांना भुरळ घातली. रणवीर सिंहचा राऊडी अंदाज. अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जून रामपाल यांच्या भूमिकाही प्रचंड गाजल्या. कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून दाद  मिळत आहे. सर्वत्र धुरंधरची हवा आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच बिग बॉस मराठी फेम अभिजीत बिचुकले याने या चित्रपटावरून वक्तव्य केलं. नुकत्याच झालेल्या एका इव्हेंटमध्ये अभिजीत बिचुकले याने हजेरी लावली. या इव्हेंटमध्ये त्याने या चित्रपटाबाबत विधान केलं. सध्या बिचुकले याने केलेल्या विधानाची सोशल मीडियात चर्चा होत आहे. 

Continues below advertisement

बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकांसाठी खास पार्टी

अलिकडेच बिग बॉस मराठीचा रियुनियन पार पडला. अभिनेत्री स्मिता गोंदकर हिनं बिग बॉस मराठीच्या माजी स्पर्धकांसाठी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बरेच जण उपस्थित होते. तसेच अभिजीत बिचुकलेही उपस्थित होता. याच कार्यक्रमात अभिजीत बिचुकले याला धुरंधर चित्रपटाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यानं धुरंधर चित्रपटाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नवी चर्चा रंगली आहे.  व्हायरल व्हिडिओमध्ये  अभिजीत बिचुकले धुरंधर चित्रपटाबाबत बोलताना दिसत आहे.  तो म्हणाला, "आता तुम्हीच म्हणालात  ना मी धुरंधरसारखा दिसतो". 

"सिनेमातला धुरंधर लोक 50-100 दिवसांत विसरून जातील. पण महाराष्ट्राचा खरा धुरंधर हा अभिजीत बिचुकले आहे", असं तो म्हणाला. अभिजीत बिचुकलेंचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या व्हिडिओवर काही नेटकऱ्यांनी कमेंट करून बिचुकलेची खिल्ली उडवली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

बिग बॉस मराठी 6 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस

दरम्यान, लवकरच बिग बॉस मराठी 6 प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बिग बॉस मराठी सिझन 6 मधील घराचा पहिला लूक समोर आला आहे. या घरातील पहिली झलक पाहून नेटकऱ्यांनी हा सिझन पाहण्यासाठी उत्सुकता दर्शवली. अभिजीत बिचुकलेंनी बिग बॉस मराठी सिझन 2 गाजवलं होतं. त्यानंतर ते हिंदी बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. दोन्ही सिझन अभिजीत बिचुकलेने गाजवले. आता यंदाच्या बिग बॉस मराठीमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'3 वर्ष काम नाही, घराचा हप्ताही थकला..' स्वामी समर्थांना 'सॉरी' का म्हटलं?; अमृता खानविलकरने सांगितला 'तो' किस्सा