Tehran : सम्राट पृथ्वीराज (Samrat Prithviraj) या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात करणारी मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) आता लवकरच एका नव्या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जॉन अब्राहमच्या (John Abraham) 'तेहरान' (Tehran) या चित्रपटामध्ये आता मानुषी छिल्लरची एन्ट्री झाली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी  'तेहरान' चित्रपटामधील मानुषीच्या लूकचे फोटो रिलीज केले आहेत. 'तेहरान' चित्रपटामध्ये मानुषी प्रमुख भूमिका साकारणार आहे. 

Continues below advertisement

'तेहरान' या चित्रपटाचे दिग्दर्शन अरूण गोपालन यांनी केलं आहे. या चित्रपटामधील जॉन अब्राहमचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. आता चित्रपटामधील मानुषीच्या लुकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजान यांनी केली आहे. चित्रपटाचे कथानक आशीष प्रकाश वर्मा यांनी केले आहे. 

चित्रपट निर्मात्यांनी रिलीज केलेल्या फोटोमध्ये मानुषी ही दमदार लूकमध्ये दिसत आहे. ती जॉनसोबत उभी असलेली दिसत आहे. दोघांच्या हातामध्ये पिस्तूल दिसत आहे. मानुषीची हेअरस्टाइल देखील हटके दिसत आहे. मानुषीच्या या शॉर्ट हेअर लूक प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. 'तेहरान' हा चित्रपट 26 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 

Continues below advertisement

मानुषी छिल्लरचे चित्रपटमानुषीनं सम्राट पृथ्वीराज  या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये तिनं संयोगिता ही भूमिका साकारली. मानुषीचा  'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात मानुषीसोबतच विक्की कौशल देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 

हेही वाचा: