Manoj Bajpayee On The Family Man 3: बॉलिवूडच्या (Bollywood News) मोजक्या गुणी अभिनेत्यांमध्ये समाविष्ट होणारं नाव म्हणजे, मनोज वाजपेयी (Bollywood Actor Manoj Bajpayee). मनोज बाजपेयी यांचा 'द फॅमिली मॅन 3' (The Family Man 3) या वर्षी प्रदर्शित होणार आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म (OTT Platform) अमेझॉन प्राइम व्हिडीओनेही (Amezone Prime Video) याची घोषणा केली आहे. मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee) यांनी 'द फॅमिली मॅन 3'साठी 20 कोटी रुपये घेतल्याचं बोललं जातंय. मात्र, दरम्यान, मनोज बाजपेयी यांची एक जुनी मुलाखतही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी 'द फॅमिली मॅन' साठी जेवढे पैसे मिळायला हवेत, तेवढे मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. 

Continues below advertisement

माझ्याकडे पैसे नाहीत... : मनोज वाजपेयी 

'अनफिल्टर्ड विद समदिश' पॉडकास्टमध्ये बोलताना मनोज वाजपेयी म्हणालेले की, "माझ्याकडे पैसे नाहीत. 'भोसले' आणि 'गली गुलियां' सारखे चित्रपट करून कोणीही श्रीमंत होऊ शकत नाही." पुढे त्यांना समदिशनं विचारलं की, "फॅमिली मॅन'साठी तुम्हाला शाहरुख, सलमानसारखं मानधन मिळत नाही का?" त्यावर बोलताना मनोज वाजपेयींनी इंडस्ट्रीची पोलखोल केली. 

'फॅमिली मॅन'साठी मिळणाऱ्या मानधनावर बोलताना मनोज वाजपेयी म्हणाले की, "नाही... नाही... अजिबात नाही... हे ओटीटी प्लॅटफॉर्म निर्माते नियमित निर्मात्यांपेक्षा कमी नाहीत... ते पैसे देत नाहीत. जर ते एखाद्या स्टारला घेऊन आले तर ते त्याला खूप पैसे देतील... 'फॅमिली मॅन'साठी मला काही फार पैसे मिळत नाहीत. हे लोक पैसे देत नाहीत. काय होतं ना, एखाद्या गोऱ्यानं सीरिज केली तर त्याला हे लोक पैसे देतील... जे ब्रँड असतात ते चीनमध्ये फॅक्ट्री का सुरू करतात? कारण तिथे कमी पैशात काम करणारे मजूर असतात... तेच जर जॅक रयानला घेतलं तर त्याला भरपूर पैसे देतील... तसंच आम्ही त्यांच्या लेखी स्वस्तःतले मजूरच आहोत..."

Continues below advertisement

दरम्यान, बॉलिवूडच्या अनेक कल्ट सिनेमांमध्ये झळकलेले अभिनेते मनोज वाजपेयी आपल्या क्लासिक, रिअॅलिस्टिक अभिनयासाठी ओळखले जातात. 'सत्या', 'गँग्स ऑफ वासेपूर', कौन अशा अनेक सिनेमांमुळे मनोज वाजपेयी हे नाव अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. पुढे मनोज वाजपेयींनी ओटीटीवर डेब्यू करत अवघ्या देशाला वेड लावलं. त्यांची 'फॅमिली मॅन' ही वेब सीरिज तुफान गाजली. या सीरिजमधला मनोज वाजपेयींसारखा कॉमन मॅन प्रत्येकाला भावला. आता या सीरिजचा पुढचा पार्ट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Muslim Actress Married With Hindu Actor: पडद्यावर ज्या हिंदू अभिनेत्याची 'काकी' झाली, खऱ्या आयुष्यात 'ही' मुस्लिम अभिनेत्री त्याच्यावरच भाळली; धर्माची चौकट मोडून बांधली साताजन्माची गाठ