मुंबई: सप्टेंबर 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'The Family Man' वेब सीरिजला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीजन कधी प्रदर्शित होतोय याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांची ही उत्सुकता आता संपली असून 'The Family Man'चा दुसरा सीजन 2021 सालच्या फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शीत होणार आहे. या सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या मनोज वाजपेयीने याची माहिती त्याच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.


2021 साली प्रदर्शीत
मनोज वाजपेयीने याचा एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये एका बॉम्बचं चित्र दिसतंय. या बॉम्बच्या टाइमच्या ठिकाणी '2021' असं लिहण्यात आलंय. मनोज वाजपेयीनं त्यामध्ये म्हटलंय की, "ही भेटवस्तू नव्या वर्षात आपल्या भेटीला येत आहे, ती जपून उघडा." त्यामुळे 'The Family Man' च्या दुसऱ्या सीजनची आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नसल्याचं स्पष्ट झालंय. हा सीजन फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणार असल्याच्या एका ट्वीटला मनोज वाजपेयीने रिट्वीट केलंय.





गुप्तचर आधिकाऱ्याच्या भूमिकेत मनोज वाजपेयी
या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीने एका दमदार गुप्तचर आधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. श्रीकांत तिवारी नावाच्या एका व्यक्तीच्या भूमिकेत असणारा मनोज वाजपेयी आपली ओळख लपवून ठेवायचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. त्यानं अनेक सीक्रेट मिशन यशस्वी केलेले असतात. हे सर्व करत असताना व्यक्तीगत जीवनात त्याची कशी तारांबळ उडते ते मजेशीर पध्दतीनं दाखवण्यात आलं आहे. आता याच्या दुसऱ्या सीजनची झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.


'The Family Man' चा दुसरा सीजन हा पहिल्यापेक्षा अधिक धमाकेदार असणार असल्याचं पहिल्या सीजनच्या शेवटी स्पष्ट झालंय. तशी खात्री याच्या निर्मात्यांनी आधीच दिली आहे.


संबंधित बातम्या: