Manjiri Oak :  आदिनाथ कोठारेचा (Adinath Kothare) पाणी हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. मराठवाड्यातील एका पाणीदार अशी या सिनेमाची गोष्ट होती. या सिनेमासाठी आदिनाथ बरीच वर्ष काम करत होता आणि या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. कलासृष्टीसह अनेकांनी आदिनाथच्या या सिनेमाचं कौतुक केलं होतं. नुकतच प्रसाद ओकची पत्नी आणि निर्माती मंजिरी ओक (Manjiri Oak) हिने देखील आदिनाथच्या पाणी या सिनेमासाठी खास पोस्ट केली आहे. 


मराठवाड्याच्या पाण्याच्या समस्येवर आधारित पाणी हा सिनेमा आहे.अभिनेता आदिनाथ कोठारेने या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनामध्ये पाऊल ठेवलं आहे. त्याचप्रमाणे या सिनेमाची निर्मिती प्रियांका चोप्राने केलीये. हनुमंत केंद्रे यांच्या  प्रयत्नांमुळे आज नागदरवाडी हे केवळ टँकरमुक्त नाहीय, तर त्यांच्या गावातून इतर बारा गावांना पाणीपुरवठा केला जातो. त्यांची हीच यशोगाथा आदिनाथ कोठारेला भावली आणि त्यानं ती पडद्यावर आणली. याच सिनेमासाठी मंजिरीने खास पोस्ट केली आहे. 


मंजिरीची पोस्ट काय?


मंजिरीने या सिनेमासाठी पोस्ट करत म्हटलं की, सगळयात आधी मला ही फिल्म बघायला उशीर झाला त्यासाठी आदिनाथ खूप सॉरी … आदिनाथ काय बोलू ? ही तुझी पहिली फिल्म कशी असू शकते ? तू खोटं बोलतोयस...अप्रतिमम्मम...सिनेमाविषयी बोलायला माझ्याकडे काहीही शब्द नाहीत..एकच सांगते ज्या क्षणी नागदरवाडीत विहिरीला पाणी लागलं त्याक्षणी माझ्या आणि मला खात्री आहे की अनेकांच्या डोळ्यातून पाणी आलं...आणि तुझ्या घेतलेल्या कष्टांचं चीज झालं. सलाम हनुमंत केंद्रे ह्यांच्या जिद्दीला कष्टांना
आणि सुवर्णा ताईंच्या प्रेमाला...आणि तुला खूप घट्ट मिठी आणि मनापासून धन्यवाद की ह्या विषयाची आम्हाला एक सुंदर अशी गोष्ट सांगितलीस .. तुझं खूप खूप खूप कौतुक... 






आदिनाथपर्यंत हा सिनेमा कसा पोहचला?


हा प्रश्न हाती का घ्यावासा वाटला आणि तुझ्यापर्यंत हा सिनेमा पोहचला कसा? याविषयी बोलताना आदिनाथने माझा कट्टावर म्हटलं की, मी 2015 मध्ये पुन्हा एकदा दिग्दर्शनाकडे वळण्याचा निर्णय घेतला. मग अशी कोणती गोष्ट आहे,जी मला मनापासून सांगायचीये. अनेक विचार होते मनात. पण मला नेहमीच प्रश्न पडायचा की,पाण्यासारख्या एका जागतिक पातळीवरच्या प्रश्नावर गेल्या कित्येक दशकांमध्ये कोणताच सिनेमा झालेला नाही, विशेषकरुन भारतामध्ये.. यावर काहीतर करण्याचा निर्णय घेतला. मी बरंच संशोधन करत होतो. त्यामध्ये मला आमिर खानची सत्यमेव जयते ही सीरिज सापडली.पाण्यावर एक एपिसोड होतो, तो पाहताना मला एक त्यामध्ये मुलाखत पाहिली आणि ती होती हनुमंत केंद्रे यांची. ती मुलाखत पाहताना वाटलं की हे काहीतरी वेगळं आहे.


ही बातमी वाचा : 


Prajakta Mali : तुझ्यामुळे मी पण लग्न केलं नाहीये..., प्राजक्ता माळीला आली लग्नाची मागणी; म्हणाली, माझं काही खरं...