Radhika Bhide Makes TV Debut with Zee Marathi Serial: 'मन धावतंया' या गाण्यातून घराघरात पोहोचणारी गायिका राधिका भिडेला अल्पवधीतच लोकप्रियता मिळाली. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आय पॉपस्टार या कार्यक्रमात तिनं मराठी गाणं सादर केलं होतं. मराठी गाण्यामुळे तिला हिंदी परीक्षकांकडून पाठीवर कौतुकाची थाप मिळाली होती.  'मन धावतंया' या गाण्याने तिला वेगळी  ओळख दिली. हे गाणं सोशल मीडियावरही ट्रेडिंगवर होतं.  मराठी गाण्यातून प्रकाशझोतात येणारी गायिका लवकरच एका मराठी मालिकेतही झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे.  राधिका भिडे लवकरच  हा झी मराठीवरील मालिकेत दिसणार असल्याची माहिती आहे.

गायनानंतर राधिका भिडेची मालिकेत एन्ट्री होणार आहे.  झी मराठीवरील सावळ्याची जणू सावली ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. या मालिकेत मेंहदळे कुटुंब सावलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलं आहे. तसेच सावलीनं भैरवीचा चांगलाच समाचार घेतला आहे.  'माझ्या कुटुंबापासून तू लांब राहायचं', असं सावली भैरवीला सांगितलं.  

दरम्यान, मालिकेमध्ये सावली आता राधिका भिडेसोबत गाणं गाताना दिसणार आहे.  अलिकडेच झी मराठीनं सावळ्याची जणू सावली या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सावली  तिचं पहिलं गाणं रेकॉर्ड करताना दिसत आहे. प्रोमोच्या सुरूवातीला रेकॉर्डिंग रूमध्ये तिलोत्तमा, सारंग आणि सावली एकत्र असतात. तेवढ्यात रेकॉर्डिंग रूममध्ये राधिका भिडे येते. राधिकाला पाहताच सावली खूश होते.  

 

गाणं रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीला भैरवीचा फोन येतो. तेव्हा भैरवी त्या व्यक्तीला "मी सांगेन त्याच पद्धतीने रेकॉर्ड करायचं गाणं, तिचं गाणं खराब करायचं...", असं ती म्हणते. हा व्हिडिओ शेअर करत झी मराठीनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'राधिकासोबत पहिलं गाणं गाण्याचं स्वप्न सावलीचं पूर्ण होईल का?', असा सवाल उपस्थित केला आहे.  त्यामुळे भैरवीच्या सांगण्यावरून  सावलीनं रेकॉर्ड केलेलं गाणं बिघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.  सध्या हा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'पोरक्या सूरजनं कुणाकडं पाहावं?' अजित दादांचं अंत्यदर्शन मिळालं नाही; 'बिग बॉस'चा काळीज पिळवटून टाकणारा VIDEO