Vikram Gaikwad Passes Away: भारतीय सिनेसृष्टीमधून एक अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. सुप्रिसद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड (Vikram Gaikwad) यांचं मुंबईत निधन झालं आहे. काशीनाथ घाणेकर, बालगंधर्व, ठग्ज ऑफ हिंदुस्तान, शहीद भगतसिंगपासून जाणता राजापर्यंत वैविध्यपूर्ण पात्रांना आपल्या रंगभूषेने अधिक वास्तववादी करणाऱ्या प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक विक्रम गायकवाड यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जातोय. तसेच सिनेसृष्टीला हा मोठा धक्का बसला असल्याची भावना कलाकारांकडून व्यक्त केली जातेय. आज (10 मे 2025) दुपारी 4.30 वाजता दादरच्या शिवाजी पार्क स्मशान भुमित त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
प्रसिद्ध रंगभूषा संकल्पक काळाच्या पडद्याआड
विक्रम गायकवाड हे प्रसिद्ध रंगभूषाकार आणि अभिनेते होते. पानिपत, बेल बॉटम ,उरी, डर्टी ब्लॅकमेल , दंगल , पीके, झांशी, सुपर 30, केदारनाथ अशा अनेक सिनेमात त्यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून त्यांनी उत्तम जबाबदारी निभावली आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी प्रसिद्ध रंगभूषाकार म्हणून जबाबदारी पार पडली होती. पावनखिंड , फत्ते शिकस्त, शेर शिवराज अशा ऐतिहासिक मालिकांमध्ये देखील त्यांनी रंगभूषाकार म्हणून उत्तम जबाबदारी निभावली होती. त्यांना सात वेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. दंगल, संजू, थ्री इडियट्स, भाग मिल्खा भाग, पानिपत अशा शेकडो सिनेमांचे मेकअप डिझायनर ते होते. तर 2013 साली बंगाली सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने ही गौरविण्यात आलं होतं.
मंत्री आशिष शेलारांनकडून श्रद्धांजली
भाजपचे नेते आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी विक्रम गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी ते म्हणाले की, सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट, राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गायकवाड यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत संवेदनशील आणि कुशल कलाकार हरपला आहे. विक्रम गायकवाड यांनी आपल्या अद्वितीय मेकअप कौशल्याने अनेक व्यक्तिरेखा अविस्मरणीय केल्या, त्यांच्या हातून साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखा ही त्यांच्या कलाप्रेमाची साक्ष होती. त्यांचं कार्य आणि योगदान कायमच स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! असेही ते म्हणाले आहे.
सविस्तर बातमी अपडेट होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या