मुंबई : कौन बनेगा करोडपतीचा (KBC) 15 वा हंगाम अत्यंत दिमाखात सुरु आहे. यामध्ये आणखी एक स्पर्धक 7 कोटी रुपये जिंकण्याच्या जवळ आला होता. तथापि, स्पर्धक जसनील कुमारला उत्तराची खात्री नव्हती आणि त्याने गेम शो सोडण्याचा निर्णय घेतला. 


जसनील काय म्हणाला?


जसनीलने सांगितले की, मला योग्य उत्तर माहित नाही आणि तो गेम सोडू इच्छितो. ज्याला होस्ट अमिताभही सहमत झाले. शो सोडल्यानंतर त्याच्या उत्तरासाठी पर्याय निवडण्यास सांगितल्यावर जसनीलने बी पर्याय सांगितला, जे योग्य उत्तर होते. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अमिताभ तेव्हा म्हणाले की, "खेल जाते तो 7 कोटी जीत जाते आज" (तुम्ही खेळले असते तर आज 7 कोटी जिंकले असते).


जसनील 1 कोटी जिंकल्यावर काय म्हणाला?


1 कोटी जिंकल्यानंतर जसनील म्हणाला की, "सर, (अमिताभ बच्चन) मला KBC बद्दल माहिती असल्याने, या मंचावर येण्याचे माझे स्वप्न होते. 2011 पासून, मी येथे येण्याचा सतत प्रयत्न करत होतो. मला आठवते की, मी आणखी विचार करून रडलो. मी कठोरपणे काम करायचो, पण केबीसीसाठी सतत प्रयत्न केले. लोकांनी माझी थट्टा केली पण तरीही मला वाटत होते की एक दिवस मी त्यांना चुकीचे सिद्ध करेन. एक दिवस माझे संपूर्ण आयुष्य बदलेल असे मला स्वप्न पडले होते."


ज्यांच्यावर प्रश्न होता त्या लीना गाडे म्हणतात..


लीना गाडे या अनिवासी भारतीय असून त्या लंडनमध्ये स्थायिक आहेत. त्यांचे आई वडिल महाराष्ट्रीयन मराठी होते. त्या पेशाने रेस इंजिनिअर आहेत. त्या 24 hours of Le Mans रेस जिंकणाऱ्या पहिल्या महिला रेस इंजिनिअर आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांना 7 कोटींचा प्रश्न विचारण्यात आला होता. जसनील या प्रश्नाच्या उत्तराचा अंदाज बरोबर वर्तवला होता. मात्र, खात्री नसल्याने गेम शो सोडला होता. लीना गाडे यांचं नाव केबीसीमध्ये झळकल्यानंतर इन्स्टा पोस्ट करून भावना व्यक्त केल्या आहेत.  


त्या आपल्या पोस्टमध्ये म्हणतात....


कधीकधी हे जग आपल्या जीवनात वाईटानंतर चांगले आणते. @extremeelive मधील @mclarenxe संघासाठी सार्डिनियामधील अत्यंत कठीण शर्यतीच्या शनिवार व रविवारसह गेले काही आठवडे खूप आव्हानात्मक होते. अल्पशा आजाराने मंगळवारी 18 वर्षांच्या सोबतीनंतर आम्ही आमची मांजर मॉन्टी देखील गमावली. त्यामुळे माझ्या आईला आणि मला खूप त्रास झाला.






पण आज एक आनंदाची गोष्ट शेअर करत आहे. "कौन बनेगा करोडपती"मध्ये 7 कोटी रुपये जिंकण्याचा प्रश्न होता. स्पर्धक प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. त्याने एक कोटी जिंकले. मात्र, त्याचा अंदाज बरोबर ठरला होता.  हा तरुण जवळजवळ काहीच घेऊन आला नव्हता आणि त्याची एकच इच्छा होती की, त्याच्या कुटुंबासाठी आणि पालकांसाठी त्याच्या मातीने बांधलेले घर बदलून पक्के घर बांधावे. तो एका दुकानात मजूर म्हणून काम करतो, त्याला त्याच्या आजूबाजूच्या लोकांनी सांगितले होते की, तो काहीही जिंकणार नाही, पण त्याने त्यांना किती चुकीचे सिद्ध केले.