Maithili Thakur Net Worth: बिहारमधील (Bihar Election) मधुबनी जिल्ह्यातील मातीतून उठलेला एक आवाज केवळ देशभरातच नाही तर जगभरात गुंजतोय. तिचं नाव मैथिली ठाकूर (Maithili Thakur). फक्त 25 वर्षाची असलेल्या या तरुणीनं आपल्या गोड आवाजानं लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण, सध्या ती चर्चेत आहे, एका वेगळ्याच कारणामुळे. मैथिली ठाकूर सध्या बिहार विधानसभेच्या (Bihar Vidhansabha Election) रणांगणात उतरली आहे.
बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. मैथिली बिहारमधील दरभंगा जिल्ह्याच्या अलीनगर विधानसभेतून रिंगणात उतरली आहे. तसेच, मैथिली भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. फक्त एका लाईव्ह परफॉर्मन्सनं लाखो लोकांपर्यंत पोहोचणारी मैथिली दरमहा किती कमावते तुम्हाला ठाऊक आहे का? निवडणुकीचा अर्ज दाखल करताना मैथिलीनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात तिनं आपली संपत्ती जाहीर केलीय. प्रतिज्ञापत्रानुसार, पंचवीस वर्षाची मैथिली कोट्यवधींची मालकीण आहे.
मैथिली एका लाईव्ह परफॉर्मन्स लाखो रुपये घेते. याशिवाय, ती तिच्या यूट्यूब चॅनल आणि आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमधून भरघोस उत्पन्न मिळवते. मैथिली सध्या भाजपच्या तिकिटावर बिहारमधील अलीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतेय.
लहानपणापासूनच लागली संगीताची गोडी (Loved Music Since Childhood)
मैथिली ठाकूरचा जन्म बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी इथे झाला. तिचे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीत शिक्षक आहेत आणि त्यांनी तिला लहानपणापासूनच लोक संगीत आणि शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण दिलं. घरातील वातावरण संगीतमय होतं, त्यामुळे लहानपणापासूनच तिला संगीताची गोडी लागली. तिचे दोन भाऊ, ऋषव आणि अयाची, तबला आणि हार्मोनियम वाजवतात. आधी ही तिनही भावंड एकत्र आपल्या राहत्या घरीच व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो यूट्यूबवर अपलोड करायचे. हळूहळू, या भावंडांच्या व्हिडीओंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आणि मैथिली ठाकूर आणि तिच्या भावंडाचं नाव घराघरात पोहोचलं.
एका टेलिव्हिजन शोमधून ओळख मिळाली (Got Recognition From Television Show)
2017 मध्ये कलर्स चॅनलच्या 'रायझिंग स्टार'मध्ये दिसल्यानंतर मैथिली ठाकूरला देशभरात ओळख मिळाली. या शोनं तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर आपलं गाणं सादर करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला राष्ट्रीय निर्माते पुरस्कारानंही सन्मानित केलेलं.
लोकसंगीताची ओळख
मैथिलीनं मैथिली, भोजपुरी आणि हिंदी गाण्यांना एका नव्या स्वरुपात सर्वांसमोर सादर केलं आणि तरुणांना लोकसंगीताशी जोडलं आहे. तिच्या आवाजात पारंपारिक गोडवा आहे, तरीही तिची शैली पूर्णपणे आधुनिक आहे. म्हणूनच तिच्या व्हिडीओंना YouTube वर लाखो व्ह्यूज मिळतात.
मैथिली एका महिन्याला किती कमावते? (How Much Does Maithili Earn In Month?)
मैथिली एका शोसाठी 5 ते 7 लाख रुपये घेते. ती महिन्याला सुमारे 10-12 शो करते. ती तिच्या यूट्यूब चॅनेलद्वारे देखील कमाई करते. तिचं अंदाजे मासिक उत्पन्न 50 लाख ते 90 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तिच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात तिनं तिची तब्बल 1.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता, 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने आणि वाहनं असल्याचं जाहीर केलं आहे. तिनं असंही म्हटलंय की, तिच्याकडे 1.80 लाख रुपयांची रोख रक्कम आहे.
आता राजकारणात एक नवी इनिंग (Maithili New Innings In Politics)
अलिकडेच, मैथिली ठाकूर भाजपमध्ये सामील झाली आणि तिला दरभंगाच्या अलीनगर मतदारसंघातून तिकीट देण्यात आलंय. राजकारणात प्रवेश करूनही ती म्हणते की, संगीत तिची खरी ओळख राहील. मैथिली सांगताना सांगते की, "संगीत माझ्यासाठी आयुष्यासारखं आहे. मी जे काही कमावते, ते माझ्या कुटुंबाच्या वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचे परिणाम आहेत..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :