Maine Pyar Kiya fame actress Bhagyashree seriously injured : 'मैंने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्रीला पिकलबॉल खेळताना गंभीर  दुखापत झालीये. अभिनेत्रीच्या कपाळावर खोल जखम झाली असून 13 टाके पडले आहेत. या घटनेनंतर भाग्यश्रीला ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 


भाग्यश्री 'पिकल बॉल' खेळताना गंभीर जखमी


'मैने प्यार किया' फेम अभिनेत्री भाग्यश्री जखमी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'पिकल बॉल' खेळताना तिच्या कपाळावर दुखापत झाल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे. शस्त्रक्रियेदरम्यान कपाळावर 13 टाके पडल्याची माहितीही समोर आलीये.. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या हॉस्पिटलमधून झालेल्या शस्त्रक्रियेचे फोटो समोर आले आहेत. यासोबतच त्याच्या कपाळावर खोल जखमही दिसून येत आहे.


'मैंने प्यार किया' या चित्रपटातून कमावलं नाव 


अभिनेत्री भाग्यश्रीने हिंदीशिवाय भोजपुरी, मराठी आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून या अभिनेत्रीने खूप नाव कमावले होते. सध्या भाग्यश्री चित्रपटांमध्ये कमी दिसत असली तरी ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.  तिच्या चाहत्यांसाठी ती सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत असते. स्टाइलच्या बाबतीत ती बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. भाग्यश्रीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले आहेत.


नंतरच्या काळात सिनेसृष्टीत पुनरागमन का केलं नाही?


काही दिवसांपूर्वी 'मिड-डे'ला दिलेल्या मुलाखतीत भाग्यश्रीने तिने चित्रपटांमध्ये लवकर पुनरागमन का केले नाही? याबाबत भाष्य केलं होतं. भाग्यश्री म्हणाली होती की, प्रत्येक नोकरदार महिलेला काम आणि मातृत्व यात समतोल राखणे अवघड असते. आई झाले तेव्हा मी खूप लहान होते आणि दोन्ही गोष्टी सांभाळणे तितके सोपे नव्हते. समतोल निर्माण करणे योग्य की अयोग्य हे सांगणे योग्य ठरणार नाही. ही अशी लढाई आहे जी तुम्हाला रोज लढावी लागते. त्यामुळे तुम्ही खंबीर राहा, पुढे जा आणि तुमचे काम करा, असं आवाहनही भाग्यश्रीने महिलांना केलं.


 






इतर महत्त्वाच्या बातम्या


Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने घेतलेली कार नेमकी किती कोटींची? इतकी महागडी कार घेणारी पहिलीच भारतीय अभिनेत्री!