Mahima Chaudhry Leander Paes Break Up : टेनिसपटू लिएंडर पेस (Leander Paes) हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. तो गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री किम शर्माला (Kim Sharma) डेट करता आहे आणि लवकरच दोघे कोर्ट मॅरेज करणार आहेत अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. लिएंडर पेस हा अभिनेत्री महिमा चौधरीला (Mahima Chaudhry) देखील डेट करत होता. काही वर्षानंतर दोघांचे ब्रेक-अप झाले. ब्रेक-अप झाल्यानंतर महिमानं एका मुलाखतीमध्ये लिएंडर पेसबद्दल सांगितलं होतं.
मुलाखतीमध्ये महिमानं सांगितलं, ' लिएंडर पेस हा चांगला खेळाडू आहे. पण तो चांगला माणूस नाहिये.' रिपोर्टनुसार, लिएंडर हा महिमाला डेट करत असतानाच संजय दत्तची एक्स पत्नी रिया पिल्लईसोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यामुळे त्या महिमा आणि लिएंडरचा ब्रेक-अप झाला. पुढे महिमानं म्हणाली, 'त्याचा आयुष्यात दुसरी व्यक्ती आहे हे कळाल्यावर मी थक्क झाले. माझ्यासाठी हा काळ खूप कठिण होता.'
महिमासोबत ब्रेक-अप झाल्यानंतर लिएंडर हा रियासोबत अमेरिकेमध्ये गेला. रिया आणि लिएंडरला एक मुलगी झाली. पण नंतर रियानं लिएंडरच्या विरोधात घरगुती हिंसेचा आरोप केला. 2006 साली महिमानं बॉबी मुखर्जीसोबत लग्न केले. पण 2013 मध्ये महिमानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल क्या करे' या चित्रपटामुळे महिमाला विशेष लोकप्रियता मिळाली. तिच्या परदेस या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये महिमासोबत शाहरूख खाननं देखील प्रमुख भूमिका साकारली होती.
हेही वाचा :
- Sher Shivraj : भारतातच नव्हे, तर परदेशातही ‘शेर शिवराज'चा डंका, मराठी चित्रपटाचे शो जगभरात ‘हाऊसफुल’!
- Happy Birthday Ashwini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येणारा चेहरा! जाणून घ्या अभिनेत्री अश्विनी भावेंबद्दल...
- Irsal : 'इर्सल'मध्ये दिसणार माधुरी पवारच्या नखरेल अदा, 'या बया दाजी आलं' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार!