Horoscope Today 5 December 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज 5 डिसेंबर (December) 2025 चा दिवस आहे. त्यानुसार आजचा वार शुक्रवार आहे. आज मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. आजचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. त्यानुसार आज देवीची पूजा केली जाते. आणि देवीसाठी उपवास ठेवून मनातील इच्छा व्यक्त केली जाते. तसेच, ग्रहांच्या हालचालीच्या दृष्टीने देखील आजचा दिवस खास असणार आहे. कारण आज महाशक्तिशाली गजकेसरी राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्रहांच्या संक्रमणाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार आणि 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा असणार आहे. यासाठी वाचूयात सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य (Horoscope Today)

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी आजच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडतील. नवीन लोकांशी संपर्क वाढेल. तसेच, जे लोक बेरोजगार आहेत त्यांना लवकरच चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे. घरात आनंदाचं वातावरण राहील.

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीसाठी दिवसाची सुरुवात शुभकारक असणार आहे. आज तुम्हाला अशी व्यक्ती भेटेल जी तुमच्यामध्ये सकारात्मक बदल निर्माण करेल. राजकारणात तुम्हाला यश मिळेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचं वर्तन तुमच्याप्रति चांगलं असेल. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीसाठी आजचा दिवस प्रगतीचा असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होतील. प्रामाणिकपणे आजचा दिवस जगाल. अनेक गोष्टी निरीक्षणातून तुम्हाला कळतील. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. काही महत्त्वाच्या योजना तुम्ही राबवाल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. तसेच, महत्त्वाची कामे तुमची वेळेत पूर्ण होतील. मित्रांचं सहकार्य मिळेल.

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवता येईल. अनेक आठवणींना उजाळा द्याल. तसेच, समाजात देखील तुम्हाला मान-सन्मान मिळेल. हाती घेतलेलं कार्य वेळेत पूर्ण कराल.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीसाठी मार्गशीर्ष पौर्णिमेनंतरचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय मिळेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच मनासारखी नोकरी मिळेल. भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेऊ नका. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. मात्र, व्यवसायाच्या बाबतीत तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. तसेच, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवून काम करावं लागेल. मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल.

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. शेअर बाजारात तुम्ही गुंतवलेल्या पैशांतून तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच, राजकीय प्रकरणातही तुम्ही फसण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना नीट विचार करा. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस भावनात्मक असणार आहे. आज तुम्हाला धार्मिक यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळेल. तुमच्या हातून अनेक चांगले कार्य घडतील. तसेच, संध्याकाळ नंतरचा काळ फार इमोशनल असण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे आज पूर्ण करु शकता. तुमच्या करिअरला वेगळं वळण लागेल. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असल्यामुळे तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. पण, जसजसा दिवस पुढे जाईल तुमची घालमेल सुरु होईल. एखाद्या गोष्टीच्या सतत विचाराने तुमची मानसिक शांती भंग होईल. अशा वेळी योग आणि चिंतन करणं गरजेचं आहे. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Margashirsha Purnima 2025 : देवी लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय असतात 'या' 5 राशी; मार्गशीर्ष पौर्णिमेपासून सुरु होतील 'अच्छे दिन', घरात सोन्याच्या पावलांनी येणार पैसा