Mahie Gill Struggle Story: तिग्मांशू धुलिया (Tigmanshu Dhulia) यांचा 'साहेब, बिवी और गँगस्टर' (Saheb, Biwi Aur Gangster) आणि अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) 'देव डी' (Dev D) सिनेमांमधील आपल्या भूमिकांमुळे प्रकाशझोतात आलेली बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे, माही गिल (Mahie Gill Birthday Story). जेव्हा माहीला फिल्ममध्ये संधी मिळाली, तेव्हापासून आतापर्यंत माही गिलनं मागे वळून पाहिलेलं नाही. फिल्म्ससोबतच अभिनेत्री आपल्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. पण, माही गिलचा (Mahie Gill) बॉलिवडपर्यंत (Bollywood News) पोहोचण्याचा आणि इथे टिकून राहण्याचा प्रवास फारसा सोपा नव्हता.
माही गिलचं वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी बालविवाह झालेला. पण, त्यानंतर माहीचा संसार फार काळ टिकला नाही. त्यानंतर अभिनेत्रीनं वयाच्या चाळीशीत एका गोंडस मुलीला जन्म दिला. पण, त्यानंतर वयाच्या 47 व्या वर्षी तिनं पुन्हा आपली लग्नगाठ बांधली. एका जुन्या मुलाखतीत बोलताना माहीनं स्वतः याबाबत खुलासा केलेला. 2012 मध्ये टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माही गिलनं सांगितलेलं की, जेव्हा त्यांच्या नात्यात फारच खटके उडू लागले, त्यावेळी माहीनं आपल्या पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
बिनलग्नाची आई बनली 'ही' अभिनेत्री
अभिनेत्रीनं सांगितलं की, दोघांचं लग्न मोडण्याचं कारण होतं की, त्यावेळी ती खूपच लहान आणि इमॅच्युअर होती. 'फॅमिली ऑफ ठाकूरगंज'च्या प्रमोशनवेळी माही गिलनं एका मुलाखतीत बोलताना सांगितेलं की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहते आणि तिला एक मुलगी आहे. माहीनं म्हटलेलं की, मला खूप गर्व आहे की, मी एका मुलीची आई आहे.
'नवभारत टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत माहीनं आपण 'सिंगल मदर' असल्याचं जाहीर केलेलं. माही म्हणालेली की, "तुम्ही मला विचारलंच आहे, म्हणून सांगते की, मी अविवाहित असून एका मुलीची आई आहे. याबाबत आधी मला कोणीच काही विचारलं नव्हतं. त्यामुळे मला मुलगी असल्याचं कोणालाच सांगितलं नाही. ही गोष्ट लपवण्याचा प्रश्नच कुठे येतो? माझ्या मुलीचं नाव वेरोनिका आहे. माझी मावशी तिची काळजी घेते. आम्ही मुंबईत एकत्र राहतो. मी लग्न करण्याची काय गरज आहे? अविवाहित राहूनही एखादी व्यक्ती आनंदात जगू शकते. लग्नाशिवायही एखाद्याचं कुटुंब आणि मुलं असू शकतात. लग्न ही निश्चितच सुंदर गोष्ट आहे. पण लग्न करणं हा वैयक्तिक निर्णय आहे. प्रेम माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. माझ्यावर प्रेम करणारी, विश्वास ठेवणारी आणि स्वातंत्र्य देणारी व्यक्ती मला हवी आहे. माझा बॉयफ्रेण्ड गोव्यात राहतो. म्हणून मी वारंवार तिथे जात असते. आम्ही सध्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये आहोत. आम्ही कदाचित काही काळानं लग्न करू"
दरम्यान, 2019 मध्ये, माही रवी केसरसोबत दिसलेली आणि दोघे डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. अशातच काही वर्षांनी 2023 मध्ये माही गिलनं हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केलेला की, तिचं रवी केसरशी लग्न झालेलं आहे. सध्या ही अभिनेत्री तिच्या पती आणि मुलीसह गोव्यात राहते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :