Madhuri Dixit Vinod Khanna Dayavan Movie Controversy: बॉलिवूडची (Bollywood News) धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. साठीच्या उंबरठ्यावर असलेली माधुरी आजही आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करते. माधुरीनं आजवरची आपली प्रत्येक भूमिका तेवढ्याच ताकदीनं साकारलीय. माधुरीची 1988 मध्ये आलेली फिल्म 'दयावान' (Dayavan Movie) खूप गाजली. या फिल्ममध्ये माधुरी सुपरस्टार अभिनेते विनोद खन्ना (Vinod Khanna) यांच्यासोबत दिसलेली. पण, याच सिनेमातील एका गाण्यामुळे माधुरीची जोरदार चर्चा रंगलेली. एवढी की, आजही या सिनेमाचा साधा विषय जरी निघाला तरी, सर्वात आधी माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्यावर चित्रित झालेल्या त्या गाण्याचीच चर्चा सर्वात आधी होते. या फिल्ममध्ये माधुरीनं विनोद खन्ना यांच्यासोबत इंटीमेट सीन शूट केलेले. पण, त्यावेळी घडलेल्या काही गोष्टींनंतर मात्र माधुरीनं पुन्हा कधीच असे सीन्स न करण्याची शपथच घेतली.
विनोद खन्नांसोबतचा 'तो' इंटीमेट सीन अन् माधुरीची ती शपथ (Madhuri Dixit Vinod Khanna Dayavan Film)
'धुरंधर'मध्ये झळकलेला अक्षय खन्नाचे सुपरस्टार वडील विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांचा गाजलेला सिनेमा 'दयावान' आजही चर्चेत आहे. फिल्म रिलीज होऊन आज 30 वर्षांहून अधिक काळ लोटलाय, पण तरीसुद्धा आजही त्या सिनेमातल्या विनोद खन्नांसोबतच्या माधुरीच्या इंटिमेट सीनची जोरदार चर्चा रंगते. पण, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत तो सीन करताना माधुरी पुरती अनकम्फर्टेबल झालेली. नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना माधुरीनं यावर भाष्य केलं आहे.
रेडियो नशाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना माधुरीनं सांगितलं की, तो सीन शूट करताना ती अक्षरशः लाजेनं अर्धमेली झालेली. त्यासोबतच खूपच अनकम्फर्टेबल झालेली. त्यानंतर मात्र माधुरीनं त्या पुढे तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या. याबाबत सांगताना माधुरी म्हणाली की, त्यावेळी ती ग्रोइंग आणि लर्निंग प्रोसेसमध्ये होती. प्रत्येक गोष्टीतून आपण शिकतो आणि त्यातूनही मी खूप काही शिकले. पण, त्यानंतर मात्र मी लाजेनं अर्धमेली झालेले आणि त्याचवेळी ठरवलं की, पुढे असं काहीच करायचं नाहीये. दरम्यान, माधुरीनं यापूर्वीही सांगितलंय की, ज्यावेळी तिनं फिल्म साइन केली, त्यावेळी तिला फिल्मच्या सीन्सबाबत पूर्णपणे ठाऊक नव्हतं, आजही तो सीन पाहिल्यानंतर ती थक्क होते.
शुटिंग वेळी नेमकं काय झालेलं?
ज्यावेळी 'दयावान' आला, त्यावेळी विनोद खन्ना म्हणजे, हिंदी सिनेसृष्टीतला सुपरस्टार आणि माधुरी अगदी लहानगी इंडस्ट्री नवखी. त्यावेळी माधुरी इंडस्ट्रीत आपलं नाव कमावण्याच्या प्रयत्नात होती. 'दयावान' सिनेमानं त्यावेळी सर्वांना हादरवून सोडलेलं. ऐंशीच्या दशकात एवढा बोल्ड सिनेमा करणं म्हणजे, धाडसंच. त्यात 'आज फिर तुम पर प्यार आया है' गाणं म्हणजे, इंटिमेट सीन्सचा भडिमार. मीडिया रिपोर्टनुसार, माधुरीला वाटलेलं त्यापेक्षाही कित्येक पटींनी जास्त बोल्ड सीन्स शूट करायचे होते. अशातच असंही बोललं जातं की, शुटिंगवेळी विनोद खन्ना वाहवत गेलेले. त्यावेळचा किसिंग सीन दिग्दर्शक कट म्हटल्यानंतरही सुरूच होता. तिकडे दिग्दर्शक कट, कट म्हणत राहिला आणि इकडे विनोद खन्ना माधुरीचे ओठ चघळत राहिले. माधुरीच्या ओठांमधून अक्षरशः रक्त येऊ लागलं. त्यावेळी माधुरी घाबरलेली, रडू लागलेली.
मीडिया रिपोर्टनुसार, त्यावेळी माधुरीनं तो सीन फिल्ममधून हटवण्याची विनंती केलेली आणि त्यासंदर्भात मेकर्सना लीगल नोटीसही पाठवलेली. पण, फिरोज खान यांनी तो सीन डिलिट केला नाही. या सीनसाठी माधुरीला अतिरिक्त 1 कोटी रुपये दिले, त्यावेळी ही मोठी रक्कम होती. नंतर विनोद खन्ना यांनी माफी मागितली, पण त्याचा परिणाम इतका खोलवर झाला की, माधुरीनं पुन्हा कधीही त्यांच्यासोबत काम केलं नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :