Mahi Vijs Emotional Birthday Post for Nadeem: प्रसिद्ध टिव्ही कपल माही विज आणि जय भानुशाली विभक्त झाले. दोघांनी काडीमोड घेतला असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चांना उधाण आलं. माहीनं जयसोबत सोशल मीडियावर एकत्रित फोटो शेअर केला. दरम्यान, जय भानुशालीशी घटस्फोट घेतल्यानंतर तिनं एका खास व्यक्तीसाठी फोटो पोस्ट केला. तसेच लांबलचक कॅप्शनही लिहिले. दरम्यान, ज्या व्यक्तीसाठी तिने इतके लांबलचक, प्रेमळ कॅप्शन लिहिले, ती व्यक्ती नेमकी आहे तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत. माहीची ती पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
माही विजची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल
टिव्ही अभिनेत्रीनं सोशल मीडियावर ज्या व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे, ती तिचा सर्वात चांगला मित्र नदीम आहे. माहीने नदीमसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात माही नदीमला केक भरवत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्रीनं पोस्ट शेअर करत एक सुंदर कॅप्शन देखील दिलं आहे. तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं की, "मी ज्या व्यक्तीची निवड केली आहे, ती योगायोग नाही तर, मनाचा निर्णय आहे. तुला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. तू मला शब्दांशिवाय समजून घेतोस. तसेच नेहमी स्वेच्छेने मला पाठिंबा देतो. तू फक्त माझा चांगला मित्र नाही तर, माझा आधार, माझी शक्ती आणि माझे घर आहेस", असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं.
'नदीम, मी तुझ्यावर प्रेम करते'
"आम्ही भांडतो. कधी कधी गप्प बसतो. पण शेवटी, आम्ही नेहमीच एकमेकांकडे जातो. कारण नदीम आणि माही मनापासून एकमेकांना जोडलेले आहेत. आयुष्य सोपे नव्हते. पण तुझ्यासोबत सर्व काही चांगले वाटते. नदीम, मी तुझ्यावर प्रेम करते. आता आणि नेहमीच करेन. कारण मला तू सुरक्षित वाटतोस. मी तुझ्यासोबत सर्व काही शेअर करू शकते", असंही तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं. सध्या माहीची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
जय आणि माही झाले विभक्त
जय भानुशाली आणि माही विज हे एकेकाळी टीव्हीवरील पॉवर कपल होते. पण आता ते वेगळे झाले आहेत. दोघे 11 नोव्हेंबर 2011 रोजी लग्नबंधनात अडकले होते. ते एकूण तीन मुलांचे पालक आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या
८ वर्षांनंतर स्वीटी गुप्ताची एन्ट्री? मिर्झापूरबाबत श्रिया पिळगावकरची पोस्ट चर्चेत